Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

तोंडाच्या वाफा सोडून तुम्ही फक्त परशुराम उपरकर होऊ शकता!

तोंडाच्या वाफा सोडून तुम्ही फक्त परशुराम उपरकर होऊ शकता!

आमदार निलेश राणे यांनी वैभव नाईकांना फटकारले

मालवण | प्रतिनिधी : माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनायच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तोंडाच्या वाफा सोडून तुम्ही फक्त परशुराम उपरकर होऊ शकता. असे सांगत आमदार निलेश राणे यांनी वैभव नाईकांना फटकारले आहे.

आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टिकास्त्र सोडले आहे. आपल्याला अनेकांना माहित नसेल परशुराम उपरकर म्हणजे कोण, राणे साहेबांच्या सोबत राहून उद्धव ठाकरेंना टीप देणारे हे शिवसैनिक होते. त्यानंतर राणेसाहेबांनी शिवसेना सोडली त्या पोटनिवडणुकीमध्ये या उपरकरांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. उद्धव ठाकरेंनी उपरकरांना विधान परिषद दिली त्यानंतर हे महाशय मनसेत गेले. मनसेमध्ये गटबजी केली, राज साहेबांनी कार्यकारणी बरखास्त करून याची हकालपट्टी केली. हा ऊबाठात गेला आणि आज साधी ग्रामपंचायत निवडणूक लढू शकत नाही अशी राजकीय अवस्था परशुराम उपरकरची आहे. याचा एकच छंद राणे परिवारावर रोज उठून टीका करायची. आज बघायला गेलं तर रिकामटेकडे असलेले वैभव नाईक हे परशुराम उपरकर यांच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल करत आहेत. वैभव नाईक, काहीतरी नवीन निर्माण करा, स्वतःच्या खिशात हात घाला आणि सिंधुदुर्गासाठी काहीतरी निर्माण करा. तोंडाच्या वाफा सोडून तुम्ही फक्त परशुराम उपरकर होऊ शकता, लोकं तुमचं नाव लक्षात ठेवतील असं कार्य काहीतरी उभं करा नाहीतर तुमची ओळख राणेंचे विरोधक हीच आयुष्यभर राहणार. अशी टिका कुडाळ मालवण मतदारसंघघाचे आमदार निलेशजी नारायणराव राणे यांनी केली आहे.

rapan bottom