19 मे रोजी चंद्रशेखर राणे व आंबेगाळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील आंबेगाळी येथे चंद्रशेखर राणे (राणे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सचिव मुंबई) आणि आंबेगाळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी श्री देवी सातेरी प्रासादिक तरुण नाट्य कला क्रीडा मंडळ, कवठी कुडाळ प्रस्तुत, लेखक वसंत कानेटकर लिखित आणि संतोष सांगळे दिग्दर्शित दोन अंकी सामाजिक, कौटुंबिक, हृदयस्पर्शी, राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त "अखेरचा सवाल" हे नाटक पूर्व प्राथमिक शाळा रंगमंच, आंबेगाळी येथे सादर होणार आहे.
तरी सर्व नाट्य रसिकांनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन आंबेगाळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


