Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

१५८ कोटी मंजूर निधीतून कर्ली नदी किनारा संरक्षण प्रकल्पाचा देवबाग येथे उद्या भूमिपूजन सोहळा

१५८ कोटी मंजूर निधीतून कर्ली नदी किनारा संरक्षण प्रकल्पाचा देवबाग येथे उद्या भूमिपूजन सोहळा

खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या माध्यमातून आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत देवबाग येथे कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करणे या कामासाठी 158 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार 16 मे रोजी सकाळी 10:30 वा. देवबाग विठ्ठल मंदिर येथे खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.

कर्ली नदी व देवबाग गावच्या किनाऱ्याच्या संरक्षसाठी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार तथा आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तब्बल 158 कोटी निधी मंजूर झाला. राज्याच्या अर्थसंकल्पात या निधीची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्या नंतर तत्परतेने या कामाला सुरवात होत आहे. गतिमान विकास म्हणजे महायुती सरकार, गतिमान विकास म्हणजेच 'राणे' हे पुन्हा एकदा या निमित्ताने दिसून आले आहे.

मोठया प्रमाणात विकासनिधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरवात होत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने महायुती सरकार तसेच मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, होत असलेल्या या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामस्थ तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले आहे.

rapan bottom