Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

बेकायदा वाळू वाहतुकीविरोधात २ डंपरवर कुडाळ पोलिसांची कारवाई

बेकायदा वाळू वाहतुकीविरोधात २ डंपरवर कुडाळ पोलिसांची कारवाई

निलेश जोशी | कुडाळ : शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या उत्खनन केलेल्या वाळूची चोरी करून तिची विनापरवाना अवैधरित्या चोरटी वाहतूक करीत असताना कुडाळ पोलिसांनी दोन डंपरवर कारवाई केली. ही कारवाई पिंगुळी ते वडगणेश रेल्वे ब्रिज जवळ करण्यात आली. यामध्ये चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून तीस हजार रुपये किमतीची वाळू आणि दोन डंपर जप्त करण्यात आले आहेत.
कुडाळ पोलीस ठाण्यातून दिलेल्या माहिती नुसार, पहिल्या डंपर प्रकरणी पोलीस शिपाई सुबोध संभाजी मळगावकर यांनी याबाबत फिर्याद दिली असून पिंटूकुमार सुखदेव सिंग (वय ३१, राहणार पेडणे बस स्टॉप जवळ) व विशाल शिवाजी केरवडेकर (वय ३९, रा मडगाव गोवा) यांच्यापैकी संशयित आरोपी क्रमांक १ याने संशयित आरोपी क्रमांक २ यांच्या संगनमताने डंपर क्रमांक जीए-०८- बीव्ही-५५६७ यामध्ये शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या उत्खनन केलेल्या वाळूची चोरी करून तिची विनापरवाना अवैधरित्या चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आला, असे तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये पंधरा हजार रुपये किमतीची वाळू व पाच लाख रुपये किमतीचा डंपर जप्त करण्यात आला आहे. दुसऱ्या डंपर प्रकरणी पोलीस हवालदार समीर रामचंद्र कोचरेकर यांनी फिर्याद दिली. राजू केशप्पा राठोड (वय २९, राहणार बांदा मूळ कर्नाटक) व शमित याकूब जद्दी (वय २९ रा झाराप-कामळेवीर) हे संगनमताने डंपर क्रमांक जीए-०७- टी -२५१४ मधून शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या उत्खनन केलेली वाळूची चोरी करून तिची विनापरवाना अवैधरित्या चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आले. पंधरा हजार रुपये किमतीची वाळू व पाच लाख रुपये किमतीचा डंपर जप्त करण्यात आला आहे. दरम्यान चारही संशयित आरोपीना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली, अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

rapan bottom