मालवण | प्रतिनिधी : शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक तसेच धर्मनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 268 व्या जयंतीनिमित्त, मालवण कुंभारमाठ सकल हिंदू समाजातर्फे भगव्या उत्साहात मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
श्री स्वयंभू मंदिर कुंभारमाठ येथून मोटर सायकल रॅलीची सुरुवात झाली. मालवण शहर बाजारपेठ मार्गे पुन्हा कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी रॅली आली. यावेळी शिवभक्त भूषण साटम यांच्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल च्या मार्गदर्शनाने रॅली चा समारोप करण्यात आला.

"सिंदूर मिशन" मध्ये आपल्या भारतीय सैनिक यांनी दहशतवादाच्या विरोधी जे शौर्य दाखवले, पाकिस्तान हद्दीत घुसून पराक्रम दाखवला. त्याचे कौतुकही या निमित्ताने करण्यात आले. अशी माहिती शिवभक्त भाऊ सामंत यांनी दिली.

