निलेश जोशी | कुडाळ : एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याचीवाडी विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. या परीक्षेत 39 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
प्रथम क्रमांक विनोद मुकुंद राऊळ 92.60 टक्के, द्वितीय .महादेवराज रामकृष्ण गडकरी 91 टक्के व प्रतीक मंगेश गावडे 91 टक्के,तृतीय हर्षद विजय लोहार 90.20 टक्के यांनी मिळविले. संस्था उपाध्यक्ष डी.ए. सामंत, चेअरमन समाधान परब, सचिव अवधूत रेगे व सर्व संस्था संचालक व मुख्याध्यापक अनंत सामंत व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

दहावी निकाल | माड्याचीवाडी विद्यालयाचा १०० टक्के निकाल
