उत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा कायम
निलेश जोशी | कुडाळ: एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट,संचलित एस.एल.देसाई विद्यालय पाट ने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन करून उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
परीक्षेसाठी एकूण 120 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 118 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यालयाचा 10 वी चा निकाल 98.33% लागला असून एकूण विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्यांनी 90%व त्या पेक्षा जास्त गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.
प्रथम क्रमांक कुमार यश प्रशांत चव्हाण 97.00%, द्वितीय क्रमांक कुमार प्रज्योत विजय मेस्त्री. 96.20%, तृतीय क्रमांक कुमार जयवंत सुधीर कुडव 95.40%, 90%टक्के व त्या पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले विद्यार्थी - कुमारी साळसकर सोहनी संदीप 95.20%, कुमारी मेस्त्री तेजस्वी संजय 95.00%, कुमार मांजरेकर यश वैभव 94.80%, कुमार काळे वैष्णव तानाजी 94.20%, कुमार मयेकर दिनार शैलेश 93.00%, कुमार परब मयूर महेश 92.80%, कुमार वेंगुर्लेकर विनायक संजय 91.80%, कुमार परब पुष्पराज चंद्रकांत 91.80%, कुमार गोसावी तन्मय तुकाराम 91.40%, कुमारी रावले मनस्वी दादू 90.60%, कुमार परब त्रग्वेद रविंद्र 90.20%, कुमारी परब भूमिका भरत 90.00%,

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था उपाध्यक्ष दिगंबर सामंत,संस्था कार्यवाह समाधान परब ,सचिव अवधूत रेगे,संस्था सदस्य राजेश सामंत देवदत्त साळगांवकर,तसेच इतर सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, सर्व शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले

