निलेश जोशी | कुडाळ : बिबवणे पंचक्रोशी शिक्षण संचालक मंडळ संचलित लक्ष्मीनारायण विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला.एकूण 43 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. प्रथम वरद संदेश प्रभू 92 टक्के,द्वितीय श्रेया शंकर चव्हाण 91. 60 टक्के,तृतीय अंतरा दत्तप्रसाद खानोलकर 90.60 टक्के गुण मिळविले.उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष राजाराम सावंत, सचिव प्रकाश कुबल,खजिनदार भरत सामंत, उपाध्यक्ष आनंद गावडे, सहसचिव विठ्ठल माळकर व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक बी. एन.पारधी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षक पालक संघ पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले

बिबवणेच्या लक्ष्मीनारायण विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के
