वराडकर हायस्कुल कट्टा येथील हर्षदा किसन हडलगेकर द्वितीय तर वराडकर हायस्कुल कट्टा येथीलच श्रेया समीर चांदरकर तालुक्यात तृतीय
मालवण तालुक्याचा दहावीचा निकाल ९९. ३९ टक्के | ३० शाळांचा निकाल १०० टक्के
अमित खोत | मालवण : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावी परीक्षेत मालवण तालुक्याचा निकाला टक्के ९९.३९ लागला. तालुक्यातून ९८७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले त्यापैकी ९८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४६४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी तर ३६१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. १४० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि १६ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. मालवण तालुक्यातील ३४ शाळांपैकी ३० शाळांचा निकाल १०० टक्के लागला. अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुलच्या आर्या अजित राणे व श्रेयस चंद्रशेखर बर्वे यां दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवीत प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला. तर कट्टा वराडकर हायस्कुलची विद्यार्थिनी हर्षदा किसन हडलगेकर हिने ९९. ४४ टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक तसेच वराडकर हायस्कुल कट्टा येथील श्रेया समीर चांदरकर हिने 98.40 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

मालवण तालुक्यातील शाळांचा निकाल खालील प्रमाणे
टोपीवाला हायस्कुलचा निकाल १०० टक्के | आर्या राणे व श्रेयस बर्वे १०० टक्के गुण
मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. या शाळेमधून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतील आर्या अजित राणे व श्रेयस चंद्रशेखर बर्वे या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १०० टक्के गुण मिळवून प्रशालेसह मालवण तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावीत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. शाळेतून निशांत शरद धुरी याने ४८९ गुण मिळवीत द्वितीय क्रमांक मिळविला. तर अमूल्या हेमंत साटम हिने ४८८ गुण मिळवीत तृतीय क्रमांक मिळविला. आर्या समीर लवू (४८४) हिने चतुर्थ क्रमांक तसेच सायली विनायक भिलवडकर (४८१) व जिज्ञासा शिवराम सावंत (४८१) यांनी पाचवा क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुदेश मयेकर, सचिव विजय कामत, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
चौके हायस्कुल १०० टक्के
चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित भ. ता चव्हाण म.मा. विद्यालय चौके या प्रशालेचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या प्रशालेतून निहारिका महेश सावंत हिने ८९. ८०टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. तर समीक्षा धोंडी सडवेलकर (८७. ६०टक्के ) हिने द्वितीय क्रमांक व श्रीयन सतेज चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळविला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रसिका गोसावी यांच्यासह शिक्षक वृंद, मुंबई संस्था पदाधिकारी, स्थानिक संस्था अध्यक्ष बिजेन्द्र गावडे यांनी अभिनंदन केले.
कन्याशाळा १०० टक्के निकाल
मालवण येथील ल. टो. कन्याशाळेचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये प्रथम- तरन्नुम अबुबकर बांगी (७८.८० टक्के), द्वितीय - हर्षिता रवि गावकर (७८ टक्के), तृतीय- कृष्णा संजय अमरे (७३.६० टक्के) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कृ. सि. देसाई शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
रोझरी इंग्लिश मीडियम स्कूल १०० टक्के
मालवण येथील रोझरी इंग्लिश मीडियम स्कूल दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम चैत्राली मेस्त्री (९५.०८ टक्के), द्वितीय वेदांती फोंडेकर (९३.०८ टक्के) तृतीय एरीक मेंडीस व तृष्टी केळुसकर (९२.०८ टक्के) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चालक, प्रिन्सिपल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
देवबाग हायस्कुलचा निकाल १०० टक्के
देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये कुमार दत्तप्रसाद तेंडोलकर याने ९१. ६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तर वेदिका महेंद्र शेलटकर (८६. ८० टक्के) हिने द्वितीय क्रमांक तर पवित्रा शंकर कुमठेकर (८४. २० टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अखिल देवबाग विकास मंडळ मुंबईचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये आर्यन गोलतकर प्रथम
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल मालवणचा निकाल ९७. २२ टक्के लागला. या परीक्षेस ७२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ७० उत्तीर्ण झाले. आर्यन आनंद गोलतकर ९५. ६० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आला. विशेष प्रविण्य श्रेणीत २५, प्रथम श्रेणीत २९, द्वितीय श्रेणीत १५ तर उत्तीर्ण श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण झाला. प्रशालेतून जान्हवी प्रमोद चव्हाण ही ९४ टक्के गुण मिळवून द्वितीय तर भूमिका प्रसाद केळूसकर ९२ टक्के गुण मिळवून तृतीय आली. प्रणव मिलिंद डिचवलकर याने ९१. २० टक्के गुण मिळवून चतुर्थ आणि भावेश ललितकुमार वराडकर हा विद्यार्थी ९१ टक्के गुण मिळवून पाचवा आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई चे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, खजिनदार जॉन नरोना, मुख्याध्यापक हणमंत तिवले यांच्यासह संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
ओझर विद्यामंदिरचा निकाल १०० टक्के
कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर या शाळेचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा यावर्षीही शंभर टक्के निकाल लागला आहे. भूमिका सदानंद कोचरेकर हिने ९१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तर संचिता संदेश परब (८९. ८० टक्के) द्वितीय क्रमांक आणि कुमार राज केशर जुवाटकर (८६ टक्के) तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर राणे, सचिव जी. एस. परब, खजिनदार शरद परब, सर्व संचालक, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, पालक शिक्षक संघ यांनी अभिनंदन केले.
कट्टा येथील वराडकर हायस्कूलची हर्षदा हडलगेकर प्रथम
कट्टा येथील वराडकर हायस्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून या प्रशालेची विद्यार्थिनी हर्षदा किसन हडलगेकर हिने ५०० पैकी ४९७ गुण (९९. ४० टक्के) मिळवीत शाळेत प्रथम क्रमांक पटकावीला. श्रेया समीर चांदरकर हिने ४९२ गुण (९८. ४० टक्के) मिळवीत द्वितीय क्रमांक तर वेदांत सुशांत परब याने ४८५ गुण (९७ टक्के) मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
या शाळेतून ७० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त-कर्नल शिवानंद वराडकर (निवृत्त), अॅड. एस.एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष- आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव-सुनील नाईक विजयश्री देसाई सहसचिव- साबाजी गावडे व इतर संचालक शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, मुख्याध्यापिका सौ. देवयानी धनंजय गावडे यांनी अभिनंदन केले.
वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के
कट्टा येथील वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. या शाळेतून नवनीत सोमनाथ परब हा ९६. ६० टक्के गुण मिळवून प्रथम आला. या शाळेतून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच जाई अमित आंबेकर हिने ९५. ८० टक्के गुण मिळवून द्वितीय तर आर्या निलेश राऊळ हिने ९२. ८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त-कर्नल शिवानंद वराडकर (निवृत्त), अॅड. एस.एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक विजयश्री देसाई, सहसचिव, साबाजी गावडे व इतर संचालक शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष अनिल फणसेकर, मुख्याध्यापक ऋषिकेश रवि नाईक यांनी अभिनंदन केले.
आचरा पंचक्रोशीतील शाळांचा १०० टक्के निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आलेली होती. यात आचरा पंचक्रोशीतील शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे
धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कुल आचरा हायस्कूल ने दहावी परीक्षेत उज्वल यश संपादन करत सर्व च्या सर्व 74 विद्यार्थी उत्तीर्ण होत १०० टक्के निकाल लागला. प्रथम क्रमांक भूमी आशिष नाबर 96.80 टक्के, द्वितीय क्रमांक कुंदन धनंजय नाटेकर 92.40 टक्के, तृतीय क्रमांक रिया महेश गांवकर 90 टक्के प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी, स्थानिक स्कूल कमेटी चेअरमन निलिमा सावंत, समिती सदस्य बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, राजन पांगे, संजय पाटील तसेच मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक अंकुश घुटूकडे यांनी अभिनंदन केले आहे
धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित माध्यमिक शालांत परीक्षेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडियम स्कुल आचरा चा निकाल १००% लागला. प्रशालेतून 35 विद्यार्थी परीक्षेत बसले होते ते सर्वजण उत्तीर्ण झाले असून १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये विशेष नाविन्यपूर्ण यश प्राप्त केले. प्रथम क्रमांक दिनेश प्रफुल्ल माळगावकर -92 टक्के, द्वितीय क्रमांक मिताली संजय माळकर - 91.80 टक्के तृतीय क्रमांक मधुरा नरेश मसुरकर 90.80 टक्के या विध्यार्थ्यानी प्राप्त केलेत या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब- मिराशी, स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष निलेश सरजोशी,खजिनदार परेश सावंत, सदस्य मंदार सांबारी, सुरेश गांवकर, दिलीप कावले, मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले आहे.
वायंगणी हायस्कूलची मंजिरी घाडीगावकर 94 टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम
वायंगणी येथील श्री ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर वायंगणी हायस्कूलचे दहावी परीक्षेस बसलेले सर्वच्या सर्व 17 विद्यार्थी पास होत या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. प्रथम मंजिरी पुरुषोत्तम घाडीगावकर 94 टक्के, द्वितीय क्रमांक सेजल सत्यवान केळूसकर 88.20 टक्के, तृतीय क्रमांक आकांक्षा मंगेश तोंडवळकर 86.80 टक्के प्राप्त केलेत या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कूल कमेटी सदस्य पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले आहे.
त्रिंबक हायस्कूलचा निकाल १००टक्के
त्रिंबक येथील जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूल दहावी परीक्षेस बसलेले सर्वच्या सर्व 22 विद्यार्थी पास होत या शाळेचा निकाल १००टक्के लागला आहे.
या शाळेतून प्रथम क्रमांक कोमल संतोष अपराज 92.20 टक्के, द्वितीय क्रमांक शर्वरी प्रशांत परब 92.00 टक्के, तृतीय क्रमांक केतकी प्रसाद घाडीगावकर 90.20 टक्के मिळवून यश संपादन केले आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबकचे अध्यक्ष श्री सुरेंद्र सकपाळ, उपाध्यक्ष श्री अशोक बागवे, कार्यवाह श्री अरविंद घाडी, तसेच सर्व कार्यकारणी तसेच मुख्याध्यापक श्री. प्रवीण घाडीगांवकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
आडवली हायस्कूलचा निकाल १०० टक्के.
आर ए यादव हायस्कूल आडवली दहावी शालांत परीक्षेत प्रविष्ठ सर्वच्या सर्व 15 विद्यार्थी पास होत शंभर टक्के यश संपादन केले.या परीक्षेत ऋतुजा सुरेश मेस्त्री हिने 86.80 टक्के गुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. प्रशालेतून द्वितीय भक्ती दिपक लाड हिने 81टक्के तर सानिका उमेश घाडीगांवकर 79.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वोदय एज्यूकेशन सोसायटी मुंब ई संस्थाचालक, मुख्याध्यापक शिक्षक आदींनी अभिनंदन केले आहे.
पेंडुर न्यू इंग्लिश स्कुलमध्ये दहावीच्या परीक्षेत पेंडूरकर भगिनी प्रथम
पेंडूर येथील न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर या प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये साक्षी योगेश पेंडूरकर आणि श्रुती योगेश पेंडूरकर या दोघींनी प्रत्येकी ९१.२० टक्के गुण मिळवीत शाळेतून प्रथम क्रमांक पटकावीला. तर ऋतुजा सुहास परब (८६. ८० टक्के) हिने द्वितीय क्रमांक व निधी लक्ष्मण सरमळकर (८६. ४० टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळविला.
या सर्व विद्यार्थ्यांचे माध्यमिक शिक्षण संस्था पेंडूरचे अध्यक्ष बाबाराव राणे, सचिव घन:श्याम राणे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. तावडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
हिवाळे ज्ञानदीप विद्यालयाचा १०० टक्के निकाल
हिवाळे येथील ज्ञानदीप विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या शाळेतून परीक्षेस प्रविष्ठ झालेले सर्व १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेमधून साईल संजय पवार याने ४०६ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तर संकेत सुभाष परब (३८३) याने द्वितीय व जीवन प्रकाश पडवळ (३६९) याने तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
वडाचापाट शांतादुर्गा हायस्कुलचा निकाल १०० निकाल
वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यां शाळेतून गायत्री बळीराम शिंदे ही विद्यार्थिनी ८७. ६० टक्के गुण मिळवून प्रथम आली तर तन्मय दत्तात्रय राणे (८४ टक्के) याने द्वितीय क्रमांक व ईशा हेमंत हडकर (८०. ६०टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळविला. ७ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, ८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी व १ विद्यार्थ्यांने उत्तीर्ण श्रेणी मिळवली. यशस्वी विद्यार्थ्यांचे भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई चे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, खजिनदार जॉन नरोना, मुख्याध्यापक श्री. प्रसाद कुबल यांच्यासाह संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
शिरवंडे त्रिमूर्ती विद्यालयाचा निकाल १०० टक्के
शिरवंडे येथील त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. या प्रशालेतून शिवम संतोष भोगटे याने ९३.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तर आदित्य कृष्णा घाडीगांवकर (९२.२० टक्के) व दत्तप्रसाद लवूराज गांवकर (९२.२० टक्के) यांनी द्वितीय क्रमांक तर दिप्ती हरिश्चंद्र गांवकर (९१.६०टक्के) याने तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई चे अध्यक्ष बाबू बाणे, उपाध्यक्ष अच्युत भावे, कार्याध्यक्ष शंकर घाडीगांवकर सरचिटणीस तुषार राऊत, सहसचिव अशोक भावे, विजय घाडीगांवकर, खजिनदार भाऊराव घाडीगांवकर, सहखजिनदार पंढरीनाथ भावे, अंतर्गत हिशेब तपासणी सचिन गांवकर, शालेय समिती अध्यक्ष सहदेव चव्हाण, कार्यकारिणी सदस्य सदानंद चव्हाण, प्रशांत गांवकर, शालेय समिती सदस्य, श्री.चंद्रकांत गांवकर, श्री.दशरथ घाडीगांवकर, श्री.कैलास घाडीगांवकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक श्री वामन तर्फे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक पालक संघ सदस्य यांनी अभिनंदन केले.
पोईप वर्दम हायस्कुलचा निकाल १०० टक्के
पोईप येथील सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. या प्रशालेतून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेतून मितेश मंगेश मेस्त्री याने ८७. ८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावीला. द्वितीय क्रमांक श्रेया बाळा धुरी (८६. २० टक्के) याने तर तृतीय क्रमांक वैदेही दीपक धुरी (८५. ८० टक्के) हिने मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अनिल कांदळकर, सचिव विलास माधव, उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, सर्व विद्यमान संचालक, मुख्याध्यापक श्री. कुंभार व सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.
जय गणेश इंग्लिश स्कुलचा निकाल १०० टक्के
मालवण एज्यूकेशन सोसायटी संचलित जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. आर्या दत्तात्रय कुबल हिने ९६ टक्के गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच सेजल आबाजी गावकर (९५. ४० टक्के) हिने द्वितीय क्रमांक तर सावली रविंद्र मोरजकर (९५ टक्के) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुदेश मयेकर, सचिव विजय कामत, इतर संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
खोटले परब हायस्कुलचा ९३. ७५ टक्के निकाल
खोटले येथील सौ. सुहासिनी श्रीधर परब हायस्कुलचा दहावीचा निकाल ९३. ७५ टक्के लागला. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या १६ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये काजल भिकाजी पुजारे हिने ३९४ गुण मिळवीत शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला. तर प्रणव समीर परब (३९३) याने द्वितीय व भक्ती संतोष जाधव (३८९) हिने तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष आनंद (भाई) सावंत, सचिव यशवंत परब, विश्वस्त तसेच शाळा समिती अध्यक्ष नंददीपक गावडे, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
रेकोबा विद्यालयाचा निकाल ९०. ९१ टक्के
मालवण वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९०.९१ टक्के लागला. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या २२ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये भावना निलेश सरमळकर हिने ८८. ६० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला. तर साक्षी गणेश कवटकर (८३. ४० टक्के) हिने द्वितीय क्रमांक तर अनुष्का अविनाश मेस्त (७७. ८० टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
भरतगड हायस्कूल मसुरे देऊळवाडा नंबर 2 चा निकाल शंभर टक्के
मसुरे देऊळवाडा येथील भरतगड हायस्कूल नंबर दोन या प्रशालेचा दहावी परीक्षेचा निकाल 100% लागला आहे. 77.80 % गुण मिळवून कुमारी स्वराली समीर बागवे हिने प्रथम क्रमांक मिळविला 76.20% गुण मिळवून नेहा राजेश चिंदरकरने द्वितीय क्रमांक मिळविला व
75.20% गुण मिळवून तन्वी दिनेश लाड हिने तृतीय क्रमांक मिळविला. या प्रशालेतून एकूण चार विद्यार्थी परीक्षेला बसले होते चारही उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मसुरा एज्युकेशन सोसायटी मुंबई कमिटीचे माननीय अध्यक्ष डॉक्टर दीपक मुळीक परब, सेक्रेटरी प्रसाद बागवे तसेच लोकल कमिटी अध्यक्ष राजन बागवे, शाळा समिती अध्यक्ष सोनोपंत बागवे व प्रभारी मुख्याध्यापक एस आर कांबळे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, कमिटी सदस्य यांनी अभिनंदन केलेले आहे.
मसुरे आर पी बागवे हायस्कूल निकाल शंभर टक्के
मसूरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक. संस्कृती सन्मेष मसुरेकर 94.40% द्वितीय क्रमांक आदित्य अनिल मेस्त्री 83.40%, तृतीय क्रमांक विभागून संचिता संतोष जाधव 81.40 आणि धीरज संतोष मसुरकर 81.40 . यावेळी सोळा विद्यार्थी परीक्षेला बसले होते 16 ही उत्तीर्ण झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व प्रशालेच्या वतीने संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक परब, सेक्रेटरी प्रसाद बागवे, लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, शाळा समिती अध्यक्ष सरोज परब, मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे, महेश बागवे, संस्था सभासद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
माध्यमिक विद्यालय बीळवस शंभर टक्के
माध्यमिक विद्यालय बीळवस या प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला असून श्रावणी सदाशिव पालव 93.80 प्रथम क्रमांक, नेहा आनंद पालव 91.40% द्वितीय क्रमांक, सिद्धी उदय पालव 89% तृतीय क्रमांक प्राप्त केले आहेत. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सूर्यकांत पालव, सरचिटणीस श्री अशोक पालव, मुख्याध्यापक श्री जयवंत ठाकूर आणि संस्था सभासद, पदाधिकारी, सर्व समिती सदस्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
असरोंडी माध्यमिक विद्यालय 100 टक्के निकाल
असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ असरोंडी माध्यमिक विद्यालय 100 टक्के निकाल लागला. विजया जंगले 87.60 टक्के प्रथम, सानिका कोकरे 86.60 टक्के द्वितीय, स्वप्नाली खरात 84 टक्के तृतीय क्रमांक प्राप्त केला. प्रशालेतील 6 विद्यार्थी विशेष श्रेणी, प्रथम श्रेणी 13, द्वितीय श्रेणी 1 यांनी यश प्राप्त केले.
- क्रिएटिव्ह हेड : जुबेर खान, मालवण

