मितेश मेस्त्री प्रथम, श्रेया धुरी द्वितीय तर वैदेही धुरी तृतीय
मालवण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. मालवण तालुक्यातील सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 ला या प्रशालेतून 50 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 50 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
प्रशालेतून प्रथम क्रमांक मितेश मंगेश मेस्त्री (87.80) , द्वितीय क्रमांक श्रेया बाळा धुरी (86.20), तृतीय क्रमांक वैदेही दीपक धुरी (85.80) या विद्यार्थ्यांनी पटकावला. एकूण विद्यार्थ्यांपैकी 14 विद्यार्थ्यांनी विशेष प्रवीण, 22 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर उर्वरित 14 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अनिल कांदळकर, सचिव विलास माधव, उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, सर्व विद्यमान संचालक, मुख्याध्यापक श्री कुंभार सर व सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.

