Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरू असलेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत कामांची पूर्तता प्राधान्याने पावसाळ्यापूर्वी करावीत : पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरू असलेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत कामांची पूर्तता प्राधान्याने पावसाळ्यापूर्वी करावीत : पालकमंत्री नितेश राणे

ग्रामविकास मंत्र्यांनी मागणीला मान्यता देत अधिकाऱ्यांना दिले निर्देश

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर ही केली चर्चा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत (PMGSY) चालू असलेल्या कामांची पूर्तता प्राधान्याने पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली.ग्रामविकासमंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीला मान्यता देत ग्रामविकासमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले.या बैठकीला प्रधान सचिव (ग्रामविकास व पंचायत राज),सचिव पंतप्रधान ग्रामसडक योजना, व अन्य अधिकारी उपस्थीत होते.

या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत चालू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेऊन प्रस्तावित कामांच्या मंजुरीचा ही आढावा घेण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा मोठा जोर असतो त्यामुळे पावसाळ्यापूर्वी चालू असलेल्या कामांचा वेग वाढवण्यात यावा अशी प्रमुख मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी केली.या मागणीला मान्यता देत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी पालकमंत्री राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या ग्रामविकासमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत तात्काळ योग्यती कार्यवाही करण्याची मागणी केली.

rapan bottom