Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

डायल ११२ वर खोटी माहीती देणाऱ्या विरुदध कुडाळ पोलीसांची कारवाई

निलेश जोशी |

निलेश जोशी | कुडाळ : डायल ११२ वर खोटी माहिती देऊन पोलीस प्रशासनाच्या वेळेचा व मनुष्यबळाचा दुरुपयोग केल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी नितीन सहदेव तांबे (वय 50 वर्षे, रा. भडगांव बुद्रुक टेंबवाडीता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग) याच्यावर कारवाई केली आहे. त्याच्या विरुद्ध तपास करण्याची मंजुरी न्यायालयाकडून घेण्यात आली असून सदर आरोपीत याचेविरुदध त्याने केलेल्या गुन्हयाबाबत तपास करण्यात येत आहे.अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, शासनाने नागरीकांना आपतकालीन कालावधीमध्ये तातडीची मदत मिळावी याकरीता डायल 112 ही आपतकालीन जलद प्रतिसाद सुविधा कार्यान्वित केलेली आहे. डायल 112 वर नागरीकांनी पोलीस मदत मिळण्याकरीता संपर्क साधल्यावर त्याची तात्काळ दखल पोलीस विभागाकडून घेवुन नागरीकांना पोलीस मदत पुरविण्यात येते. सदर सुविधेमुळे बऱ्याच नागरीकांना अपघातात / नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच इतर आपत्तकालीन परिस्थितीमध्ये तात्काळ पोलीस मदत पुरविण्यात आलेली असुन बऱ्याच नागरीकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेचे रक्षण करण्यात आलेले आहे.


परंतु काही नागरीक हे वरील सुविधेचा दुरुपयोग करुन डायल 112 वर खोटी माहीती देवुन पोलीस प्रशासनाच्या वेळेचा व मनुष्यबळाचा दुरुपयोग करतात. दि. 09.05.2025 रोजी डायल 112 वर "इंडीया को उडाना है! ईनशा अल्लाह, मेरे भाईजान आ रहे है" असा फोन आला. सद्या भारत पाकिस्तान या देशाचे युदध सुरु असल्याने सदर फोनचा कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी गंभीर दखल घेवुन तात्काळ सदर फोन करणाऱ्या इसमाचा शोध सुरु केला. त्यावेळी सदर फोन करणारा इसमाचे नाव नितीन सहदेव तांबे, वय 50 वर्षे, रा. भडगांव बुद्रुक टेंबवाडीता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग असे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरची माहीती ही खोडसाळपणाने दिलेली असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत सदर इसमावर कुडाळ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास करण्याची मंजुरी मा. न्यायालयाकडून घेण्यात आलेली असुन सदर आरोपीत याचेविरुदध त्याने केलेल्या गुन्हयाबाबत तपास करण्यात येत आहे.


सदरची कारवाई ही अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग कृषिकेश रावले उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस ठाणे राजेंद्र मगदुम, पोलीस अंमलदार मंगेश जाधव, जनार्दन झारापकर, संजय कदम, रुपेश सारंग, योगेश मांजरेकर यांनी केलेली आहे.
डायल ११२ ही सुविधा नागरीकांना त्यांचे आपतकालीन कालावधीमध्ये तात्काळ पोलीस मदत मिळावी या हेतुने शासनाने सुरु केलेली आहे. त्यामुळे कोणीही सदर सुविधेचा दुरुपयोग करुन खोटी माहीती पोलीस प्रशासनाचा देवु नये अन्यथा अशा इसमांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी केलेले आहे.

rapan bottom