मालवण : मालवण तालुक्यातील गोळवण- कुंभादेवीवाडी येथील चिरमुले कुटुंबाचे आराध्य दैवत श्री देवी आई कुंभादेवी मंदिराचा ९ वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे.या निमित्त गुरुवारी १५ मे २०२५ रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यानिमित्त सकाळी ८ वाजता. अभिषेक, सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापुजा,आरती, दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद सायंकाळी ७ वाजता भजने असे कार्यक्रम पार पडणार आहेत तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन चिरमुले परिवारातर्फे करण्यात आले आहे.

