Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

समुद्रात बुडून सातारा येथील पर्यटकाचा मृत्यू

समुद्रात बुडून सातारा येथील पर्यटकाचा मृत्यू

तारकर्ली समुद्र किनाऱ्यावरील दुर्घटना : बुडणाऱ्या अन्य दोघा पर्यटकांना वाचवण्यात स्थानिकांना यश

मालवण | प्रतिनिधी : तारकर्ली येथील एमटीडीसी समोरील समुद्रात सातारा येथील तीन पर्यटक समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी बचावकार्य करतं दोघा पर्यटकांना समुद्राबाहेर काढून वाचवले. तर ऋषिकेश दारासिंग वाघमोडे (वय 24) हा समुद्रात बेपत्ता झाला. सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडून आला.

सातारा येथील सहा तरुणांचा ग्रुप मालवणात पर्यटनासाठी आला होता. वायरी येथील होम स्टे मध्ये ते वास्तव्यास होते. सकाळी हे तरुण तारकर्ली येथे समुद्र किनारी दाखल झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण तारकर्ली एमटीडीसी केंद्र समोर समुद्र स्नानाचा आनंद घेण्यासाठी उतरले. समुद्रात डुंबण्याचा आनंद लुटत असतानाच लाटेच्या तडाख्यात यातील ऋषिकेश वाघमोडे यांसह अन्य दोघे पाण्यात बुडाले. यावेळी इतर तिघांनी आरडाओरडा केला असता किनाऱ्यावर असलेल्या ग्रामस्थ, पर्यटन व्यावसायिक व मच्छिमार यांनी समुद्रात धाव घेतली. स्थानिकांनी दोघांना समुद्राबाहेर काढण्यात यश मिळविले. मात्र ऋषिकेश वाघमोडे हा समुद्रात बुडून बेपत्ता झाला. किनाऱ्यावर आणलेल्या दोघांना तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.

उपचारानंतर या दोघांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, तारकर्ली समुद्रात बेपत्ता झालेल्या ऋषिकेश वाघमोडे याचा स्थानिक ग्रामस्थांकडून तसेच पोलीस यांच्याकडून समुद्रात शोध घेण्यात येत होता. सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश वाघमोडे याचा मृतदेह सापडून आला.पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.

rapan bottom