कोळंब तिठा ते बोर्डिंग ग्राउंड मार्गे माघी गणेश या मार्गाचा वापर सकाळी 8 ते दुपारी 2 टाळावा
11 मे रोजी पर्यायी मार्ग बाबत पोलीस प्रशासनाचे आवाहन
मालवण : मालवण शहरात 11 मे रोजी मुख्यमंत्री व अन्य मंत्री व त्यांचा ताफा असणार आहे. त्यामुळे मालवण शहारात VIP मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. तसेच कोळंब तिठा ते बोर्डिंग ग्राउंड मार्गे माघी गणेश या मार्गाचा वापर सकाळी 8 ते दुपारी 2 टाळावा. पर्यायी वाहतूक मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्याचा वापर करावा. असे आवाहन मालवण पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. VIP रोड - बोर्डीग ग्राउंड फोवकांडा पिंपळ अप्पर डेक हॉटेल कुशेवाडा चौक --मौनीनाथ मंदिर - राजकोट किल्ला हा vip मार्ग असणार आहे.
वाहन चालकांना पर्यायी मार्ग👇
कोळंब मधुन मालवण येणाऱ्या वाहनासाठी पर्यायी मार्ग सागरी महामार्ग -देऊळवाडा - भरड
रॉक गार्डनला जाणाऱ्या वाहनासाठी पर्यायी मार्ग: फोवकांडा पिंपळ - माघी गणेश मंदिर - रोझरी - रॉक गार्डन
राजकोट किल्ला जाणाऱ्या वाहनासाठी पर्यायी मार्ग :- टोपीवाला हायस्कूल येथे वाहने लावून पायी चालत राजकोट येथे जावे
मालवण जेटी वरुन येणाऱ्या वाहनासाठी पर्यायी मार्ग :- फोवकांडा पिंपळ -नगरपालीका मालवण - भरड मार्गे देऊळवाडा
मालवण मधील सर्व रोडवर नो पार्कंग झोन

