Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण बंदराचा सर्वांगीण विकास करणार : पालकमंत्री नितेश राणे

मालवण बंदराचा सर्वांगीण विकास करणार : पालकमंत्री नितेश राणे

परिसराचे सुशोभिकरण करताना मरीना प्रकल्प विकसित करणार : स्टॉल धारक विस्थापित होणार नाही याची काळजी घेणार

महाराष्ट्र सागरी मंडळाची आढावा बैठक : आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती

सिंधुदुर्ग : आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असून मालवण हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. मालवण बंदरामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळाने वाहनतळ व टर्मिनल बिल्डींग बांधलेली आहे. या परिसरातील शासकीय जागेतील वाहनतळामध्ये उभारलेल्या स्टॉल धारकांना याच परिसरात स्टॉल उभारुन देण्यात येतील कोणीही विस्थापित होणार नाही. या परिसराचे सुशोभिकरण करताना मरीना प्रकल्प विकसित करणार असून मालवण बंदाराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या महाराष्ट्र सागरी मंडळाची आढावा बैठक झाली. यावेळी आमदार दीपक केसकरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगळे, कार्यकारी अभियंता मनीष मेतकर, पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, श्री वराडकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सागरी मंडळाच्या नियोजनाप्रमाणे स्टॉल धारकांना स्टॉल उभारुन देण्यात येणार आहेत. कोणीही विस्थापित होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. मालवण मध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. राजकोट परिसरात शिवसृष्टी देखील उभारण्यात येणार असल्याने मालवण पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरणार आहे. मालवण बंदराच्या विकासासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने आराखडा बनवावा. मालवणच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

बैठकीनंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्टॉल धारकांशी संवाद साधला.

rapan bottom