Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

राजकोट | सुबक, सुंदर आणि देखणा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा : खा. नारायण राणे

राजकोट | सुबक, सुंदर आणि देखणा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा : खा. नारायण राणे

महाराजांच्या चरणी नतमस्तक होत किल्ले राजकोट परिसराची केली पाहणी : पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांची उपस्थिती

मालवण : सुबक, सुंदर आणि देखणा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा किल्ले राजकोट येथे उभारण्यात आला आहे. महाराजांचा खरा पुतळा कसा असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा महाराजांचा पुतळा आहे. पुतळा उभारणी करणारे जागतिक किर्तीचे शिल्पकार श्री. सुतार यांचे आभार व्यक्त करतो. अशी प्रतिक्रिया खा. नारायण राणे यांनी किल्ले राजकोट येथे व्यक्त केली.

दरम्यान, या परिसराचे सुशोभीकरण, जेटीची उभारणी यांसह अन्य सुविधा शासनाच्या माध्यमातून आम्ही लवकरच उभारू. शिल्पकार श्री. सुतार यांचेही मार्गदर्शन यात घेतले जाईल. येथे येणारे शिवभक्त, पर्यटक यांना संपूर्ण समुद्र परिसर पाहता यावा. यादृष्टीनेही सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. असेही खा. नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.

किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्यदिव्य पुतळा चरणी नतमस्तक होत खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनी राजकोट परिसराची पाहाणी केली. नव्याने उभारणी झालेला हा महाराजांचा पुतळा पाहायला आलो. अतिशय आनंद होत आहे. असेही खा. नारायण राणे म्हणाले.

यावेळी शिल्पकार अनिल सुतार, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांसह तहसीलदार वर्षा झालटे, माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उप विभागीय अभियंता अजित पाटील, मुख्याधिकारी संतोष जिरगे, बिडीओ शाम चव्हाण,
आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, कुडाळ तालुकध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, पंकज सादये, सूर्यकांत फणसेकर, आबा हडकर, मच्छिमार सेल जिल्हाध्यक्ष विकी तोरसकर, महिला पदाधिकारी सोनाली पाटकर, अंजना सामंत, अमिता निव्हेकर, महिमा मयेकर, राणी पराडकर, माजी सभापती निलीमा सावंत, शाम झाड, मंदार लुडबे, नारायण लुडबे, राजू बिडये, कानडे, भाई मांजरेकर, भाऊ मोरजे, शानू वालावलकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वात उंच महाराजांचा पुतळा

राजकोट किल्ला येथे उभारणी झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा सर्वात उंच असा आहे. जमिनीपासून 93 फूट उंच असा पुतळा आहे. असे सांगून शिल्पकार श्री. अनिल सुतार यांनी पुतळा उभारणी बाबत माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 11 मे रोजी दुपारी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन पूजन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.

rapan bottom