भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची प्रमुख उपस्थिती
मालवण : मालवण तालुक्यातील त्रिबंक घाडीवाडी येथे अनेक वर्षे राखडलेले रस्ता डांबरीकरण काम पूर्ण झाले असून त्यांचे उद्घाटन ज्येष्ठ ग्रामस्थ व मानकरी एकनाथ घाडी यांच्या हस्ते झाले, तसेच त्रिंबक भाटिचे इरक बंधाऱ्याचा शुभारंभ ज्येष्ठ ग्रामस्थ आप्पा कदम यांच्या शुभहस्ते नारळ फोडून करण्यात आला.
सदर विकासकामांसाठी भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या विशेष सहकार्यातून मंजुरी मिळाली. असे सांगत ग्रामस्थांच्या वतीने आभार यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्ष मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शक्ती केंद्र प्रमुख देवेंद्र हडकर, संजय लोके, त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर, ग्रामपंचायत सदस्य नेहा वेंगुर्लेकर, माजी सरपंच राजू त्रिंबककर, दत्ता पवार, नितेश पवार, बाळा सुतार, सुयोग लब्दे, विशाल मेस्त्री, स्नेहलता मेस्त्री, प्रताप धुरी, अजय पवार, वेदांत त्रिबंककर यांसह अन्य उपस्थित होते.

