रात्रौ सत्यभामा गर्वहरण दशावतार नाट्यप्रयोग
मालवण | प्रतिनिधी : मालवण धुरीवाडा कन्याशाळा मागील मार्गांवर असलेल्या श्री महापुरुष (काजरोबा) मंदिर येथे सोमवार 12 मे रोजी त्रैवार्षिक सत्यनारायण महापुजा निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी काजरोबा येथे पूजन, दुपारी 12 वाजता सत्यनारायण पुजा, दु.1 वाजता महाआरती, दु. 1:30 वा. पासून महाप्रसाद, तीर्थप्रसाद, सायंकाळी भजने तसेच रात्री 9:30 वाजता गुरुकृपा दशावतार नाट्य मंडळ हळवल, कणकवली यांचा सत्यभामा गर्व हरण हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन महापुरुष (काजरोबा) मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

