Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

बंद सैनिक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू !

बंद सैनिक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू !

आमदार निलेश राणे यांनी ग्वाही

शिवापूरमध्ये रणस्तंभाचे उदघाटन

निलेश जोशी | कुडाळ : बंद असलेली सैनिक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर सैनिकांसाठी बंद असलेले कॅन्टीन पुन्हा सुरू केले जाईल, तसेच आजी- माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार निलेश राणे यांनी शिवापूर येथील कार्यक्रमात दिली.


देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शिवापूर गावच्या शहीद सुपुत्रांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या रणस्तंभाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी शिवापूर ग्रामपंचायत येथे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्हा सैनिक अधिकारी उमेश आईरे, कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, माजी सैनिक संघटनेचे शिवराम जोशी, विष्णू ताम्हाणेकर, बाबुराव कविटकर, आदी उपस्थित होते.
आमदार निलेश राणे पुढे म्हणाले की, देशात आज युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे सैनिक देशासाठी किती महत्वाचा आहे ते आज कळते. शिवापूर सारख्या गावातील दहा सुपुत्र देशासाठी हुतात्मा होतात ही बाब त्यांच्या कुटुंबियांसाठी दु:खद घटना असली तरी गावासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.


यावेळी रणस्तभाचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले, श्री. राणे विकासाबाबत म्हणाले की, शिवापूर- शिरशिंगे रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल. तसेच आंजिवडे घाट रस्त्यासाठी प्रयत्न केले जातील, सैनिकांसाठी बंद असलेले कॅन्टीन पुन्हा सुरू केले जाईल, पंचक्रोशीतील लाईटचा प्रश्न निकाली काढला जाईल, यावेळी पंचक्रोशीतील विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमिपुजन ऑनलाईन पध्दतीने आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले.


रणस्तभासाठी लागणारी शेड आपल्या निधीतून उभारण्यात येईल अशी ग्वाही दिली. १५० माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शहीद झालेल्या दहा सैनिक कुटुंबातील व्यक्तिंचा सत्कार आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. रणस्तभासाठी जमिन देणाऱे सुरेश नाईक यांचाही सत्कार राणे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक माजी सभापती मोहन सावंत यांनी केले .

rapan bottom