मालवण : मालवण तालुका सरपंच संघटनेच्या वतीने नूतन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष साटम, श्रीमती खोत, श्रीमती परब, श्रीमती धुरी, रवींद्र साळकर, पी. के. चौकेकर, विस्तार अधिकारी पी. डी. जाधव, व्ही. के. जाधव उपस्थित होते.
सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल. शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सांघिक प्रयत्न करुया. सरपंचाच्या सहकार्यातूनच गावचा विकास शक्य आहे. प्रशासकीय बाबतीत आपण नेहमी सहकार्य करु असे गटविकास अधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले

