Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळमध्ये मिळणार शासनाच्या 'आयुष्यमान' योजनची सुविधा

कुडाळमध्ये मिळणार शासनाच्या 'आयुष्यमान' योजनची सुविधा

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते राणे रुग्णालयात शुभारंभ

निलेश जोशी | कुडाळ : हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी आता कुडाळ मध्ये शासनाच्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गतची सुविधा डॉ जी टी राणे यांच्या राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर येथे उपलब्ध झाली आहे. त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी केले .


शासनाच्या माध्यमातून  सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, या अनुषंगाने शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजना आहेत. या योजनेअंतर्गत महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना अंतर्गत हिंदू कॉलनी, कुडाळ येथील राणे हॉस्पिटल ॲन्ड मेडिकल रिसर्च सेंटर या ठिकाणी कार्डीयॉलॉजि विभागाची सुविधा उपलब्ध झाली आहे. या योजनेचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी तसेच डॉ. जी टी राणे, डॉ. सई राणे, डॉ. अभय सावंत, श्री. भूपतसेन सावंत, डॉ गोरुले व त्यांच्या सोबत जिल्हा महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवणारी टीम उपस्थित होती.
   यावेळी बोलताना  जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले, रुग्णांसाठी शासनाच्या विविध योजना कार्यान्वित झाल्या आहेत. विशेष करून कार्डियाक या सेवेची सुविधा  राणे हॉस्पिटल अँडमेडिकल रिसर्च सेंटरयेथे उपलब्ध झाली आहे. या सेवेचा लाभ गरजु रुग्णांनी घ्यावा व आपले आरोग्य सुकर करावे असे सांगितले.


डॉ जी .टी. राणे म्हणाले,  राणे हॉस्पिटल ॲन्ड मेडिकल रिसर्च सेंटर, हिंदू कॉलनी या ठिकाणी जी कॅथलँब चालू आहे, त्याचा लाभ रुग्णांना होत आहे.प्रायमरी अँजिओप्लास्टि सारखी सुविधा सिंधुदुर्गामध्ये मिळणे हे आता ह्या कॅथलॅब मुळे शक्य झाले आहे. त्यामुळे रुग्णांना इतर जिल्हा किंव्हा राज्यात जाण्याची पळापळ कमी होईल. जे हृदय विकाराचे रुग्ण आहेत त्यांना आता महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांनी डॉ. जी. टी. राणे यांचे आभार मानले आहेत.ही सुविधा या हॉस्पिटलमध्ये सोमवार , बुधवार व शुक्रवार हे तीन दिवस असणार आहे. या तीन दिवसांत या योजने अंतर्गत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी या ठिकाणी केली जाणार आहे यासाठी गोवा येथील कार्डिओलॉजिस्ट डॉ निखिल सोनटक्के उपस्थित राहून रुग्णसेवा देणार आहेत असे डॉ राणे यांनी सांगितले.

rapan bottom