Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण बस स्थानकाचे सर्वेक्षण

मालवण बस स्थानकाचे सर्वेक्षण

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान

मालवण | प्रतिनिधी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान 2025 अंतर्गत चार सदस्यीय सर्वेक्षण समिती मार्फत मालवण बस स्थानकाचे सर्वेक्षण करण्यात आले. बस स्थानकात असणाऱ्या सेवा सुविधा, स्वच्छता यांसह अन्य बाबींची पाहाणी करण्यात आली.

यावेळी रत्नागिरी विभागीय वाहतूक अधिक्षक शंकर यादव, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी राजेश्वर जाधव, सर्वेक्षण समिती पत्रकार सदस्य अमित खोत, प्रवासी मित्र अनंत सामंत या चार सदस्यीय समिती मार्फत बसस्थानक इमारत व परिसराची पाहाणी सर्वेक्षण करून मूल्यांकन करण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी, स.वा. नि. सतीश वाळके, विनोद शंकरदास, वरिष्ठ लिपिक दिलीप हिंदळेकर आदी उपस्थित होते.

परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार सन २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे" स्वच्छ, सुंदर बसस्थानक हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियान स्पर्धात्मक स्वरुपात असून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. अभियानाचा कृती कालावधी २३ जानेवारी, २०२५ ते ३१ डिसेंबर, २०२५ असा आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती अशा ६ प्रादेशिक स्तरावर व एकत्रित अंतिम स्पर्धा राज्यपातळीवर आयोजीत करण्यात आली आहे.

प्रादेशिक स्तरावर अ वर्ग बस स्थानक अनुक्रमे प्रथम 10 लाख (फिरता चषक व प्रशस्तीपत्र), द्वितीय 5 लाख, तृतीय 2 लाख 50 हजार. ब वर्ग बस स्थानक अनुक्रमे प्रथम 5 लाख (फिरता चषक व प्रशस्तीपत्र), 2 लाख 50 हजार, 1 लाख 50 हजार. क वर्ग बस स्थानक अनुक्रमे प्रथम 1 लाख (फिरता चषक व प्रशस्तीपत्र), 50 हजार, 25 हजार अशी पारितोषिक आहेत.

राज्य स्तरावर विजेत्या बसस्थानकांना अ वर्ग प्रथम क्रमांक 1 कोटी (चषक प्रशस्तीपत्र), ब वर्ग प्रथम क्रमांक 50 लाख (चषक व प्रशस्तीपत्र), क वर्ग बस स्थानक प्रथम क्रमांक 25 लाख (चषक व प्रशस्तीपत्र) अशी पारितोषिक आहेत.

rapan bottom