Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळमध्ये ११ रोजी 'संविधान हवे, मनुस्मृती नको' कार्यशाळा

कुडाळमध्ये ११ रोजी 'संविधान हवे, मनुस्मृती नको' कार्यशाळा

स्त्रीमुक्ती चळवळीला ५० वर्षे झाल्याचे औचित्य

राज्यभरातील स्त्रीवादी महिला वक्त्यांचे मार्गदर्शन

निलेश जोशी | कुडाळ : स्त्रीमुक्ती चळवळीला पन्नास वर्ष झाली. त्या निमित्ताने येत्या ११ मे रोजी कुडाळमध्ये महालक्ष्मी हॉल येथे सकाळी १० ते ५ या वेळेत मनुस्मृती नको, संविधान हवे या कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विविध स्त्रीवादी महिला वक्त्या मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती कमलताई परुळेकर, सत्यशोधकचे ऍड सुदिन कांबळे, नितीन वाळके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कमलताई परुळेकर यांनी याबाबत हॉटेल गुलमोहोर येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला सत्यशोधकचे ऍड सुदिन कांबळे, नितीन वाळके यांच्यासह अतुल बंगे, स्वाती पेडणेकर, विशाल जाधव आदी उपस्थित होते.


कमलताई परुळेकर म्हणाल्या, आजकाल समाजात वाढत चाललेले असहिष्णू वातावरण,धर्म,वर्ग, लिंग यावरून भेदाभेद ,विशेषतः मुस्लीम विरोध हे सर्व वेळीच थोपवले नाही तर या देशात अराजक माजेल. त्याचे कारण आपण असू. पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.म्हणून याची जाणीव असलेली सर्व मंडळी कुडाळ येथे रविवारी ११ मे रोजी रोजी महालक्ष्मी हॉल येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. स्त्रीमुक्तीआन्दोलनाला 50वर्षे झाली, त्यानिमित्ताने सुवर्ण महोत्सवी वर्षात जिल्हावार मनुस्मृती नको ,संविधान हवे अभियान राबविले जात असून त्याचा एक भाग म्हणून सर्व संघटनांकडून सुमारे 150 कार्यकर्ते एकत्र येतील. मनुस्मृती व संविधान यांचा अभ्यास असलेल्यां स्त्रीवादी नेत्या सुषमा अंधारे, प्रतिमा परदेशी,असुन्धा पारधे, शमा दलवाई,संध्या म्हात्रे या वक्त्या यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.


राष्ट्र सेवादल, अंगणवाडी कर्मचारी सभा, शिक्षक भारती, आम्ही भारतीय, समता प्रतिष्ठान, अद्वैत फाउंडेशन, दर्पण प्रबोधिनी, सत्यशोधक जन आंदोलन, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, सत्यशोधक सेक्युलर फ्रंट, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नत्ती मंडल, जिल्हा शालेय स्वयंपाकी संघ , गोजिरी आश्रम इत्यादी संघटनाचा या कार्यशाळेला सहकार्य असणार आहे, असे श्रीमती परुळेकर यांनी सांगितले. तसेच यावेळी सर्वधर्मिय सलोखा समिती स्थापन करण्यात येतील. या कार्यशाळेला स्री-पुरूषानी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन कमल परुळेकर, सुदीन कांबळे, नितीन वाळके, अतुल बंगे, स्वाती पेडणेकर, विशाल जाधव यानी केला आहे.


यावेळी बोलताना ऍड. सुदिन कांबळे आणि नितीन वाळके यांनी देखील देशाच्या आजच्या परिस्थितीत अशा कार्यशाळेची आवश्यकता आणि गरज अधोरेखित केली. नामवंत स्त्रीवादी वक्त्या या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे चांगले विचारमंथन होणार आहे. या कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन या सर्वानी केले आहे.

rapan bottom