मालवण: मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी खात्याची सूत्र सांभाळल्या पासून धोरणात्मक निर्णयांचा धडका लावला आहे.पण त्याच बरोबर सर्वसामान्य मच्छीमार यांना येणाऱ्या अडचणी यांच्याबाबत पण त्यानं सूक्ष्मलक्ष घातले आहे.याचे जिवंत उदाहरण म्हणजे मालवण दांडी येथील पारंपरिक मच्छिमार श्री.संतोष केळुसकर याला मिळालेला सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक परवाना हे आहे.
पारंपारिक मासेमारीला जोड म्हणून केळुसकर यांनी पद्मदुर्ग ते सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक साठी तीन वर्षापूर्वी अर्ज केला होता. पण सदरचा अर्ज लाल फितीत अडकून होता.शासकीय शुल्क,प्रवासी नौका,इंजिन व उतर बाबीसाठी संतोष याने कर्ज घेऊन सुमारे दहा लाख पर्यंत गुंतवणूक केली आहे.परंतु प्रवासी वाहतूक परवाना मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे कर्जफेडीचे आव्हान संतोष समोर उभे राहिले होते.सदरचा परवाना बंदर विभाग म्हणजेच मंत्री नितेश राणे यांच्या अखत्यारीतील असल्यामुळे दांडी मालवण येथील माजी नगरसेविकासेजल परब तसेच श्रमिक मच्छीमार संघटनेचे सन्मेष परब यांनी भाजपा मच्छीमार सेल, सिंधुदुर्ग च्या माध्यमातून श्री.नितेश राणे यांच्या कडे सदरचा विषय मांडला. नितेश राणे यांनी तातडीने संबंधित अधिकारी यांना तात्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली.बंदर विभागाने फक्त सात दिवसात तत्काळ प्रस्तावातील तांत्रिक बाबी पूर्ण करून संतोष केळुसकर यांना पद्मगड ते सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सेवेस अधिकृत परवाना मंजूर केला.मत्स्य उद्योग मंत्री श्री.नितेश राणे यांच्या हस्तक्षेपामुळे एका मच्छीमाराची स्वप्नपूर्ती झाली याबद्दल मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून आभार व्यक्त होत आहेत.

