Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

बजरंग दल शासनास सर्वतोपरी मदतीसाठी तत्पर

बजरंग दल शासनास सर्वतोपरी मदतीसाठी तत्पर

युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या हिताच्या प्रत्येक निर्णयात सोबत ; मालवणात पोलीस प्रशासनास दिले निवेदन

मालवण | प्रतिनिधी : युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास शासन जे काही निर्णय नागरिकांच्या हितासाठी घेतील किंवा शासनास नागरिकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरवायच्या असतील किंवा सामाजिक कार्य करावयाचे असेल तर अशावेळी बजरंग दल शासनास सर्वतोपरी मदतीस तत्पर आहे. याबाबत निवेदन विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल शाखा मालवण यांच्या वतीने पोलीस प्रशासनास देण्यात आले आहे.

यावेळी भाऊ सामंत, श्रीराज बादेकर, अनिकेत फाटक, प्रसाद हळदणकर, गणेश चव्हाण, हरेश पडते, मुकुंद घाडी, स्वप्नील घाडी, पार्थ डिचवलकर, सचिन वराडकर आदी उपस्थित होते.

पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आम्ही बजरंग दल शाखा मालवणच्या वतीने आपणांस सांगू इच्छितो, सरकारने सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी कशाप्रकारे सतर्क रहावे यासाठी मॉक ड्रिल आयोजित केलेले आहे. या मॉक ड्रिल साठी बजरंग दल शाखा मालवण तर्फे आपणास काही सहकार्य लागल्यास कृपया तसे आम्हास कळवावे. आमचे कार्यकर्ते सर्वतोपरी आपल्या सहकार्यासाठी नेहमी उपस्थित असतील. तसेच पुढील काळात जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास शासन जे काही निर्णय नागरिकांच्या हितासाठी घेतील किंवा शासनास नागरिकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरवायच्या असतील किंवा सामाजिक कार्य करावयाचे असेल तर अशावेळी बजरंग दल शासनास सर्वतोपरी मदतीस तत्पर राहील.

तरी कृपया शासनास काही सहकार्य लागल्यास बजरंग दल शाखा मालवण च्या कार्यकर्त्यांना आपण निससंकोच पणे माहिती द्यावी. आम्ही शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हास जमेल तेवढे सहकार्य करण्यास तयार आहोत.सकल हिंदू समाज. असे निवेदनात म्हटले आहे.

rapan bottom