Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन ग्रा.पं. सदस्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन ग्रा.पं. सदस्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मठबुद्रुक येथे ठाकरे गटाला दिला धक्का

मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मठबुद्रुक लोहारवाडी येथील विद्यमान ग्राप सदस्य, सदस्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उबाठा गटाला धक्का बसला आहे.

शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या अभ्यासु आणि कणखर नेतृत्वाखाली मालवण कुडाळ मध्ये विकास कामांची गंगा वाहत आहे. गावात आणि प्रभागात अधिक गतिमान विकास आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो याच विश्वासाने आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याची स्पष्टोक्ती प्रवेश कर्त्यांनी दिली.

यावेळी अनंत पानवलकर, अनिता बेनकर या ग्रामपंचायत सदस्यांसह भास्कर बेनकर, सागर बेनकर, गणेश बेनकर, रुपाली बेनकर, सत्यवान भुते, संजय बेनकर, सुमती पानवलकर, अतुल पानवलकर, ममता पानवलकर, सुशांत घाडी, शुभांगी घाडी, सुनीता बेनकर, वसंत बेनकर, प्रकाश बेनकर, विरेश घाडी, निधी घाडी, अरुण भुते, शुभांगी शेमडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सरपंच बाळा वेंगुर्लेकर, उपसरपंच विनायक बाईत, माजी नगरसेवक दीपक पाटकर, निलेश बाईत यांसह शिवसेना पदाधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

गेली 2 वर्षे आम्ही आमच्या वार्डाचे सदस्य पद स्विकारून आम्हांला योग्य तो विकास निधी उबाठा गटाकडून मिळाला नाही त्यामुळे विकास कामांच्या बाबतीत आमचा वार्ड मागे राहीला ही खंत मनात होती.
म्हणून मठबुद्रुक गावचे उपसरपंच युवा उद्योजक विनायक बाईत तसेच सरपंच बाळा वेंगुर्लेकर, माजी उपसरपंच निलेश बाईत यांची भेट घेवुन विकास कामासाठी आम्हांला साथ द्या आम्ही तुमच्या प्रवाहात सामील होतो असे सांगितल्या नंतर विनायक बाईत यांनी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून वार्डात मागणी असलेली पाण्याची व्यवस्था केली. मुख्य रस्ता ते चव्हाटा पर्यंत जाणारी पायवाट याबाबत आमदार निलेश राणे यांनी दिलेला शब्द पुर्ण केला. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पाणलोस ग्रामस्थ आणि महिलांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवुन याठिकाणी शुभारंभ केला. तसेच मुख्य रस्ता ते जैन ब्राम्हण रस्ता खडीकरण डांबरीकरण शुभारंभ करण्यात आला. रामेश्वर मंदीर बुधवळे येथे होणाऱ्या वर्धापण दिनानिमित्त संपूर्ण महाप्रसादासाठी देणगी दिली. तसेच बोंबडेश्वर मंदीराची पहाणी करून ग्रामस्थांशी विविध विकास कामांबाबत चर्चा केली.

rapan bottom