Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

वैभववाडी तालुक्याचा बारावीचा निकाल ९९. ६७ टक्के

वैभववाडी तालुक्याचा बारावीचा निकाल ९९. ६७ टक्के

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्याचा बारावीचा निकाल ९९. ६९ टक्के इतका लागला आहे.  तालुक्यातून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी या विद्यालयाचे आहेत. वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु. संपदा यशवंत पुजारी हिने ९३. ५० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. तर कु. श्रेया देवजी पालकर हिने ९१. १७ टक्के गुण ( वाणिज्य )मिळवून व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. तर विज्ञान शाखेची कु. मानसी मुकुंद शिनगारे हिने ८६ टक्के गुण मिळवीत तृतीय आली आहे.    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या फेब्रवारी २०२५ उच्च माध्यमिक परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. वैभववाडी तालुक्यातून एकूण ३२९ .विद्याथी बसले होते. त्यापैकी ३२८ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.

कनिष्ठ महाविद्यालय निहाय  निकाल पुढीलप्रमाणे.. कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी  या विद्यालयातून तिन्ही शाखेतून एकूण २०७ विद्यार्थी बसले होते. या विद्यालयाचा तिन्ही शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे. विद्यालयातून वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक क्रमांक - संपदा यशवंत पुजारी ( ९३. ५०) टक्के, गुण द्वितीय क्रमांक- कु. श्रेया देवजी पालकर ( ९१. १७) टक्के, तर तृतीय क्रमांक -तनिष्का तावडे श्रृती स हिने  (८४. ६७ ),टक्के. तर विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक- कु. मानसी मुकूंद शिनगारे (८६ टक्के ),  द्वितीय क्रमांक- कु. प्राची औदुंबर तळेकर ( ८४. १७), तृतीय क्रमांक- कु. साक्षी प्रविण भोसले ( ८३. ८३ )टक्के.      कला शाखेतून प्रथम क्रमांक -कु. संचित मिलिंद जाधव ( ७१. १७) टक्के, द्वितीय क्रमांक -कु. प्राची दिपक पांचाळ ( ७०. ३३) टक्के. तृतीय क्रमांक- प्रीती दयानंद गुरव ( ७०. १७) टक्के

छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नेर्ले तिरवडे या विद्यालयातून कला शाखेतून एकूण १९ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९६ टक्के लागला आहे. विद्यालयातून प्रथम क्रमांक- कु. सिद्धेश यशवंत सुतार ( ७१. ८३ )टक्के, द्वितीय क्रमांक- कु. ऋषभ भिवाजी घाटकर( ६६.६७ )टक्के, तर तृतीय क्रमांक- कु. सायली संजय गुरव ( ६४. ८३ )टक्के. आचिर्णे आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज आचिर्णे या विद्यालयातून एकूण ६७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक -कु. पार्थ विलास पाताडे ( ७९. ८३ )टक्के. द्वितीय क्रमांक- कु. नुरनिशा गौस बोबडे (७७. ५० )टक्के. तृतीय क्रमांक- कु. सिद्धी गोविंद गावडे ( ७५. १७) टक्के. तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक -समीक्षा अनंत चंदुरकर( ८०. ६७ ) टक्के, द्वितीय क्रमांक- तनिष्क अमित खानविलकर (७७. १७ )टक्के, तृतीय क्रमांक- सिद्धी वासुदेव झोरे (७४.८३ )टक्के.

rapan bottom