Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

गोरगरीब रुग्णांचा देव हरपला ; डॉ. प्रमोद वालावलकर यांचे निधन

गोरगरीब रुग्णांचा देव हरपला ; डॉ. प्रमोद वालावलकर यांचे निधन

निलेश जोशी | कुडाळ : मूळ वालावल गावचे रहिवासी आणि सध्या कुडाळ-कुंभारवाडीत वास्तव्यास असलेले आणि महिला बाल रुग्णालयात वैद्यकीय अधिष्ठाता या पदावर कार्यरत असणारे डॉ. प्रमोद प्रभाकर वालावलकर (वय ५८) यांचे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी दुर्धर आजाराने निधन झाले. गोरगरीब रुग्णांसाठी ते एखाद्या देवदूतासारखे होते. वैद्यकीय क्षेत्रातील एक सेवाभावी व्यक्तिमत्व हरपले अशीच भावना त्यांच्या निधनाने सर्वांमध्ये होती.


डॉ. प्रमोद प्रभाकर वालावलकर हे कुडाळ हायस्कुल कुडाळचे विद्यार्थी. १९८२-८३ मध्ये त्यांनी कुडाळ हायस्कुल मधून दहावीची परीक्षा दिली. वडील प्रभाकर वालावलकर हे राष्ट्र सेवादलाचे कार्यकर्ते. त्यामुळे समाजसेवा आणि देशसेवेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळले. मुंबईमधून त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली. पण ग्रामीण भागात जाऊन वैद्यकीय सेवा करायचा असा ध्यास घेऊन ते शासकीय वैद्यकीय सेवेत रुजू झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक शासकीय रुग्णालयात त्यांनी सेवा दिली. शिरोडा, कुडाळ, सावंतवाडी, ओरोस या ठिकाणी आपल्या निरपेक्ष सेवेने रुग्णांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. गेल्या काही वर्षांपासून ते कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयात वैद्यकीय अधिष्ठाता या पदावर काम करत होते. काही वर्षांपासून ते एका दुर्धर आजाराचा देखील तितक्याच नेटाने सामना करत होते.


फक्त वैद्यकीय सेवाच नव्हे तर फुटबॉल खेळावर देखील त्यांचे प्रेम होते. मुलांनी फुटबॉलकडे वळावे यासाठी त्यांनी मुलांसाठी फुटबॉलची प्रशिक्षणे आयोजित केली. गोव्याहून स्वतःच्या खर्चाने फुटबॉल प्रशिक्षक आणले. अलीकडेच त्यांनी काही डॉक्टरांसोबत ग्लोबल सिंधु फुटबॉल क्लबची स्थापना केली होती. त्या माध्यमातून सिंधुदुर्गातून चांगले फुटबॉल खेळाडू निर्मण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. बांद्यामध्ये त्यांनी अलीकडेच १४० मुलांसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते.


वैद्यकीय सेवा देताना त्यांनी कधी कोणता भेदभाव केला नाही कि कधी रुग्णांकडून पैशाची अपॆक्षा केली नाही. प्रसंगी स्वतःच्या खिशातले पैसे घालून त्यांनी रुग्णसेवा केली. त्यामुळे सावंतवाडी, कुडाळ, ओरोस, दोडामार्ग, शिरोडा, वेंगुर्ले या परिसरात त्यांनी रुग्णसेवेने त्यांनी अनेक माणसे जोडली. लोक त्यांना माणसातील देवच समजत होते. आपल्या दहावीतील सुमारे ९० मित्र मैत्रिणींना त्यांनी एकत्र करून दरवर्षी त्यांचे स्नेहसंमेलन ते घेत होते.
पण हे सगळे करताना प्रसिद्धी पासून नेहमी दूर असल्याने त्यांच्या या लोकसेवेचा गौरव व्हावा म्हणून त्यांच्या मित्र मंडळींनी आणि राष्ट्र सेवादलाच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी १६ फेब्रुवारीला त्यांचा कुडाळ येथे भव्य सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर या सत्काराला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.


डॉ. प्रमोद यांच्या पश्चात अधिपरिचारिका प्रज्ञा वालावलकर या त्यांच्या पत्नी, मुलगा ध्रुव, भाऊ नरेंद्र, बहीण असा परिवार आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा कुडाळ येथील स्मशानभूमीत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सर्वसामान्य लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.निरपेक्ष सेवा देणारा माणसातील देव हरपला या भावनेने अनेकांना अश्रू अनावर झाले.

rapan bottom