Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

वनशक्ती आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी शिबिरास उत्साहात प्रारंभ

निसर्गभ्रमंती आणि फुलांच्या रचना कार्यक्रमाचे आयोजन

वेंगुर्ला : वनशक्ती आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उन्हाळी शिबिराची उत्साहात सुरुवात झाली. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम जागवण्यासाठी आणि सर्जनशील कौशल्यांना चालना देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराची सुरुवात आज सकाळी महाविद्यालयीन परिसरातून निसर्गभ्रमंतीने झाली. विद्यार्थ्यांनी परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास केला. वृक्ष, फुलझाडे, पक्षी आणि कीटक यांची निरीक्षणे करत त्यांनी निसर्गाशी जवळीक साधली. वनशक्तीच्या कु. करिश्मा मोहिते यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना उलगडून सांगितले.

निसर्गभ्रमंतीनंतर ‘फुलांची रचना’ (Flower Arrangement) या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी डॉ. धनश्री पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची फुले, पाने, वेली वापरून आकर्षक रचना तयार केल्या. या माध्यमातून सौंदर्यदृष्टी, संयोजन कौशल्य आणि निसर्गाशी जोडलेली कलात्मकता यांची ओळख झाली.

या शिबिरात पर्यावरण शिक्षण, सर्जनशील उपक्रम, गटचर्चा, हस्तकला आणि अनेक रंजक कार्यशाळांचा समावेश असून पुढील आठवडाभर या उपक्रमांची रेलचेल राहणार आहे.

शिबिराचे उद्घाटन शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. धनश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले. वनशक्तीच्या प्रतिनिधी कु. करिश्मा मोहिते यांनी शिबिराचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, "आजच्या पिढीला निसर्गाशी नाते घट्ट करणे ही काळाची गरज आहे."

शिबिरात स्थानिक विद्यार्थी, स्वयंसेवक आणि पर्यावरणप्रेमींचा सहभाग दिसून आला असून, हे शिबिर एक प्रेरणादायी आणि स्मरणीय अनुभव ठरणार आहे, अशी खात्री आयोजकांनी व्यक्त केली

rapan bottom