Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सि -वल्ड या जागतिक पर्यटन प्रकल्पास महायुती सरकारने पुर्णत्वाकडे न्यावे : विष्णू मोंडकर

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्य व केंद्र सरकार ने पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता दिली असून जिल्ह्यात सागरी पर्यटना सोबत आयुर्वेदिक ,ऐतिहासिक,जंगल,कृषी,मँग्रोज ,कल्चर क्षेत्रात पर्यटन व्यवसाय वाढत आहे जिल्ह्यच्या पर्यटन विकासासाठी एका आंतराष्ट्रीय प्रकल्प होणे गरजेचे आहे तो प्रकल्प म्हणजे सी -वल्ड आज तीन तीन महामार्ग जात असताना चिपी व मोपा सारखे आंतराष्ट्रीय विमानतळ असताना महायुती सरकारने हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेणे गरजेचे आहे .


सि -वल्ड जागतिक पर्यटन प्रकल्पासाठी स्थानिक जमीन मालकांनी स्वसंपादित जागा देण्याची हमीपत्र राज्यसरकार 2018 ला देऊनही सदर प्रकल्प कुठल्या मुहूर्ताची वाट बघत आहे हा प्रश्न चिन्ह आहे. सि -वल्ड प्रकल्प होण्यासाठी महायुती च्या काळात जागा संपादन प्रक्रिया चालू करण्यासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सन 2018 साली मंत्रालय मुंबई येथे आपल्या दालनात आयोजित मिटिंग मध्ये सदर प्रकल्प मार्गी लावण्याचे ठरविण्यात आले त्यावेळचे तत्कालीन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री पांढरपट्टे यांना हेक्टरी एक कोटी रुपये जमीन मालकांना जमीन संपादनासाठी. दर निच्छिती करून जमीन संपादनाचे आदेश दिले तसेच अश्या प्रकारचे अन्य नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी पर्यटन संचानालय महाराष्ट्र या विभागाची शासकीय निर्मिती केली गेली.
आज केंद्र व राज्य सरकार ही महायुतीची असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासदार व तिन्ही आमदार हे महायुतीचे आहेत मा.खासदार नारायण राणे साहेबानी हा प्रकल्प वायंगणी तोंडवळी येथे होण्यासाठी व जिल्ह्यातील नागरिकांचे पर्यटन व्यवसायातून दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रकल्पाची संकल्पना मांडली 2014 मध्ये महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी पडणवीस यांनी मालवण येथील जाहीर सभेत सदर प्रकल्प क्षेत्र1390 एकर कमी करून 341 एकर जमीनीवर सि -वल्ड प्रकल्प पूर्ण करण्याचे सांगितले.


मालवण तालुक्यातील वायंगणी-तोंडवळी येथील जागेत साकारण्यात येणारा जागतिक दर्जाचा सी-वर्ल्ड प्रकल्प एकीकडे विरोधाचा सामना करत आहे. तर दुसरीकडे जागतिक दर्जाच्या प्रकल्पाचे महत्व जाणून दोन्ही गावातील संबंधित जमीन मालकांनी पुन्हा एकदा सी-वर्ल्ड व्हावा, असा सकारात्मक सूर आळवला आहे. सी वर्ल्ड याचठिकाणी साकारण्यात यावा, याबाबत भूधारक आग्रही बनले आहेत या संबंधी जमीन मालकांनी भू संपादन अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याशी जमीन संपादन विषयी पत्रव्यवहार केला आहे लवकरच यासंबंधी स्थानिक आमदार निलेश राणे ,पालकमंत्री नितेशजी राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रकल्प पूर्णत्वासाठी जमीन धारकांना घेऊन भेट घ्यायचे पर्यटन व्यवसायीक महासंघाने ठरविले आहे . सी-वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर कोकण चे नाव पर्यटन क्षेत्रात जागतिक दर्जावर पोचवू शकतो अशी माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली आहे .

rapan bottom