Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सावंतवाडी शहर अखेर बॅनरमुक्त

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात नगर पालिकेच्या हद्दीतील जवळपास १२५ होर्डिंग्ज, फ्लेक्स बैनर, पोस्टर्स हटविण्यात आली आहेत. मंगळवारी सायंकाळी उशिरा सावंतवाडी नगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील होर्डिंग्ज हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. दोन दिवसात जवळपास १२५ होर्डिंग्ज हटविण्यात आले आहेत. आता शहरात होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स लावायचे असतील, तर ऑनलाईन परवानगी घेणे आवश्यक आहे. सावंतवाडी शहरात सहा ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती नगरपालिका मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली.


शहरात होर्डिंग्ज व बॅनर लावण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीला पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व सावंतवाडीतील नागरिक उपस्थित होते. सावंतवाडी शहरात सहा ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यास परवानगी आहे. त्यामध्ये नगरपालिका रस्त्यालगत एसपीके कॉलेज कॉर्नर, नगर परिषद कार्यालय गेट नंबर २ समोरील नगरपरिषद रस्त्यालगत, एसटी स्टैंडसमोरील भिंत, बापूसाहेब महाराज पुतळ्यासमोर रस्त्यालगत, नगर परिषदेच्या मोकळ्या जागेत नगर परिषद रस्त्यालगत, जुना शिरोडा नाका कॉर्नर नगर परिषद रस्त्यालगत, गवळी तिठा परिसर अशी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. मंगळवारी सायंकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत जवळपास २५ बॅनर्स हटविण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी बुधवारी जवळपास १०० बॅनर्स हटविण्यात आले. एकूण जवळपास १२५ बॅनर्स हटविण्यात आले आहेत. त्यामुळे सावंतवाडी शहर आता बॅनर मुक्त झाले आहे.

rapan bottom