Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

करूळ येथील हुतात्मा स्मारकाजवळ स्वच्छता मोहीम

करूळ येथील हुतात्मा स्मारकाजवळ स्वच्छता मोहीम

कणकवली : कणकवली तालुक्यातील करूळ येथील भास्कर कर्णिक हुतात्मा स्मारकका जवळ शनिवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कणकवली तालुक्याचे तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.
तहसीलदार देशपांडे यांच्या पुढाकाराने आणि करूळ सरपंच सौ समृद्धी नर तसेच करूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण नारकरआणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या सहभागाने ही मोहीम राबवण्यात आली.


सकाळी आठ वाजता या मोहिमेचा शुभारंभ झाला आणि साडेनऊ वाजता ही मोहीम संपवण्यात आली. हुतात्मा स्मारक परिसर स्वच्छ करण्यात आला.आजूबाजूची झाडी तोडून पालोपाचाळा याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच प्लास्टिक बाटल्या व इतर कचरा गोळा करण्यात आला .
या मोहिमेच्या सुरुवातीला प्रस्ताविक स्वच्छता मिशनचे स्वच्छता दूत गणेश जेठे यांनी केले. त्यानंतर शिक्षक सिद्धेश खटावकर यांनी यांनी स्वच्छतेची शपथ दिली. तसेच करून गावचे पोलीस पाटील गणेश जाधव यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली.


यावेळी तहसीलदार देशपांडे यांनी स्वच्छतेचे महत्व विशद केले. त्याशिवाय संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या स्वच्छता मिशनच्या शिलेदारांचे कौतुक केले. यावेळी सरपंच सौ समृद्धी नर यांनी करूळगाव मध्ये नेहमी स्वच्छता मोहिमा राबवल्या जातात असे सांगून सर्वांचे आभार व्यक्त केले. मुख्याध्यापक नारकर यांनीही स्वच्छतेचे महत्त्व सांगत सर्वांचे आभार मानले. महसूल अधिकारी दिलीप पाटील यांनी यापुढेही स्वच्छतेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.


या मोहिमेत महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी श्री सत्यवान माळवे पत्रकार संजय सावंत, सचिन राणे,गुरु सावंत, तुषार नेवरेकर, मोहन पडवळ, प्रदीप फोपे ,आनंद उर्फ बाबू परब, अनिल मेस्त्री, मंडल अधिकारी प्रवीण मुंडे, तरळे पोलीस पाटील, चंद्रकांत जाधव, बापू जाधव, एस एन खाडे, करूळ ग्राम महसूल अधिकारी समृद्धी गवस,आरोग्य समुदाय अधिकारी तेजस्वी पारकर, आरोग्य सेविका वंदना मराठे,संपदा कुडतरकर ,करुणा सरवणकर सुदर्शन फोपे,दिलीप कदम, श्रेया हरियाण, प्रमिला कदम,महसूल अधिकारी शुभम भालेराव, आर वी इनकर,टी डी चिकणे ,बीके मानवर, अक्षता बागवे ,रती घोडके, हेमा तोरस्कर, दत्ता डाके, मंडल अधिकारी संतोष नागावकर, मंगल गायकवाड ,एस आर राणे, अर्जुन गुनावत, गणेश गोडे, पी आर कोळपकर,उत्तेश्वर मुंडे, राजेश शिरवलकर, सोमनाथ देशमुख, सुरज शिंदे, अजय मांडेकर, नितीन डाके, नितीन राव राणे ,भारत नेवारे, जगदीप चाळके ,व्ही एस रासम ,प्रियंका मोंडकर,प्रियंका जेठे ,अवनी धोपटे मनू धोपटे , शिक्षक निलेश फोंडेकर, विनोद मिस्त्री, करूळ हायस्कूलच्या एनसीसी च्या कामया राणे व इतर विद्यार्थिनी ,स्काऊट गाईड च्या हर्षदा वर्दम व इतर विद्यार्थिनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.करूळ हायस्कूलच्या वतीने सर्वांना चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शेवटी तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी स्व इच्छेने या मोहिमेत सहभागी झाले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.

rapan bottom