अमित खोत | मालवण : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा मालवणच्या वतीने मालवण तालुक्याचे नूतन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिक्षक समितीचे नूतन तालुकाध्यक्ष जीवन हजारे, नूतन तालुका सचिव नंदकिशोर पाडगांवकर, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र प्रसाद गाड, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश गरुड, पतपेढी संचालक मंगेश कांबळी व चंद्रसेन पाताडे, तसेच शिक्षक समिती तालुका सदस्य रामचंद्र कदम, तानाजी गावडे, उदय कदम, सुषण ढवण, संदीप नेवाळकर आदी उपस्थित होते.

नूतन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी सत्काराला उत्तर देताना शिक्षक समितीचे धन्यवाद व्यक्त केले. मालवण तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मी आपल्या संघटनेच्या माध्यमातून अधिकाधिक प्रयत्न करेन, तसेच शिक्षक व विद्यार्थी यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मालवण तालुका शिक्षण क्षेत्रात अव्वल आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी यांनी केले.


