Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सत्ताधाऱ्यांच्या वाईट अनुभवामुळेच शक्तीपीठ महामार्गाला विरोध !

सत्ताधाऱ्यांच्या वाईट अनुभवामुळेच शक्तीपीठ महामार्गाला विरोध !

कुणाल किनळेकर यांची मंत्री केसरकरांवर टीका

आधी केलेल्या घोषणा पूर्ण करण्याचे केले आवाहन

निलेश जोशी | कुडाळ : गेल्या 30 वर्षात राज्यकर्त्यांकडून आलेल्या वाईट अनुभवांमुळे शक्तीपीठ महामार्गास जनतेचा विरोध असल्याची टीका मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे. वीस वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग, मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यावर चार वेळा आमदार असणारे माजी पालकमंत्री दीपक केसरकर गप्प का? सिंधुदुर्ग मधील स्थानिक जनतेला नको असलेले प्रकल्प लादण्यापेक्षा आपण घोषणा केलेले चष्म्याचा कारखाना व सेटटॉपबॉक्स निर्मिती कंपनीचे काय झाले ते जाहीर करावे, असे म्हणत श्री. किनळेकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे.


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार कुणाल किनळेकर म्हणतात, जिल्ह्याच्या जनतेने कुडाळ येथे एमआयडीसीसाठी, चिपी येथे विमानतळासाठी, माणगाव येथे धरण प्रकल्पासाठी अत्यल्प मोबदल्याच्या बदल्यात आपल्या जमिनी दिल्या तसेच दोडामार्ग एमआयडीसी व मुंबई गोवा महामार्गासाठी तसेच इतर अनेक प्रकल्पांसाठी आपल्या जमिनी देऊन सुद्धा कोणताही प्रकल्प अद्याप पर्यंत पूर्णत्वास गेलेला नाही. असे असताना पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच लाखो झाडांची कत्तल करून या नवीन शक्तिपीठ महामार्गामुळे येथील जनतेला कितपत फायदा होईल याबाबत साशंकताच आहे. फायदा झालाच तर दीपक केसरकर यांच्या मायनिंग आणि भूमाफियांसारख्या धनदांडग्या मित्रांनाच होईल.जसा मैत्रीसाठी शेतकऱ्यांची जमीन कवडी मोलाने आंदण म्हणून दिलेल्या शिरोडा टाक येथील जमीनीवर 30 वर्षांनी यांच्या मित्रांने पंचतारांकित हॉटेल सुरू केले ज्याचा स्थानिकांना काहीच फायदा नाही. आणि म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायत बांदा यांनी सुद्धा या शक्तिपीठ मार्गास ठाम विरोध दर्शवला आहे.


दोन दिवसांपूर्वी आमदार दिपक केसरकर यांनी त्यांचे मित्र तिमलो यांच्या माध्यमातून तेरा ॲम्बुलन्सचे लोकार्पण केले त्याचे स्वागतच पण 13 ॲम्बुलन्समुळे सावंतवाडी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था खरोखरच सुधारणार आहे का याबाबत प्रश्नचिन्हच आहे अशी टिका मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

rapan bottom