Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कचरा निर्मुलनात 'ॲक्वा मॅजिक'

कचरा निर्मुलनात 'ॲक्वा मॅजिक'

देवबाग सोबत तारकर्ली आणि वायरी भूतनाथ गावातही संकल्पना राबविण्यात येणार

मालवण: पर्यटन क्षेत्रात सतत निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे योग्य रित्या व्यवस्थापन करण्यासाठी देवबाग येथील ॲक्वा मॅजिक या संस्थेने पुढाकार घेतला आहे.

देवबाग येथे याबाबतचे मॉडेल यशस्वी केल्यानंतर तारकर्ली आणि वायरी भूतनाथ गावात ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. आपला परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सर्व पर्यटन व्यवसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तारकर्ली पर्यटन विकास संस्था आणि पर्यटन महासंघाकडून करण्यात आले आहे. वायरी भूतनाथ येथे या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर,तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, तारकर्ली सरपंच मृणाली मयेकर,रवींद्र खानविलकर ,केदार झाड,देवानंद लोकेगावकर, ॲक्वा मॅजिक संस्थेचे राम चोपडेकर, संदीप बोडवे, प्रभाकर वाळवे, बाळू मुंडिये, मिलिंद झाड, शाम झाड, जगदीश वेंगुर्लेकर, दर्शन वेंगुर्लेकर, राकेश कुंटे, अभय पाटकर यांसह अन्य उपस्थित होते. यावेळी बोलताना मोंडकर म्हणाले, पर्यटन क्षेत्रात सातत्याने प्लास्टिक कचरा तयार होत असतो. हा कचरा उचलण्यासाठी भंगारवाल्यांची जी साखळी होतो ती असुरक्षिती आणि अनियंत्रित होती.

याला पर्याय म्हणून मार्फत नियंत्रित कर्मचारी हॉटेल व्यावसायिकांपर्यंत पोहोचणार आहेत. सहदेव साळगावकर म्हणाले, ड्रेसकोड परिधान केलेले ॲक्वा मॅजिक संस्थेचे कर्मचारी आता कचरा उचलण्यासाठी सज्ज आहेत. येथील पर्यटन क्षेत्रात प्रतिवर्षी काही लाख प्लास्टिक बाटल्यांचा तसेच अन्य प्लास्टिकचा कचरा तयार होत असतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण होत असते. आता सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने कचरा जमा केला जाणार आहे. राम चोपडेकर म्हणाले, पर्यटन क्षेत्रातील आपला गाव, परिसर आणि किनारे स्वच्छ ठेवणे आपली सर्वांचीच जबाबदारीं आहे. अनेक वेळा पर्यटक बेजबाबदारपणे रस्त्यावर, किनाऱ्यांवर पाण्याच्या आणि मद्याच्या बॉटल्स वापरून फेकून देत असतात. फेकलेल्या प्लास्टिक पिशव्यांमुळे परिसर विद्रूप दिसतो. ॲक्वा मॅजिक संस्थेच्या माध्यमातून आपला परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. फोटो.ॲक्वा मॅजिक संस्थेच्या माध्यमातून देवबाग, तारकर्ली आणि वायरी भूतनाथ गावात प्लास्टिक कचरा निर्मूलन संकल्पना राबविण्यात येत आहे.

rapan bottom