संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील मसुरे डांगमोडे बेलाची वाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून माजी आमदार वैभवजी नाईक यांच्या प्रयत्नातून रु.३ कोटी ८ लाख निधी मंजूर झाला होता त्या पैकी बेलाची वाडी विरण रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण व त्यावरील मोऱ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे मात्र या मार्गातिल शाळे नजिकच्या ओढयावरील ब्रीज चे काम बाकी आहे.आता पावसाळा जवळ आल्याने या ब्रीज चे काम पावसाळ्यापूर्वी होणार की नाही ? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.

तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेली साईड पटी व गटारांची योग्य प्रकारे पाण्याच्या ओघा प्रमाणे खोदाई करण्यात यावी जेणेकरून पावसाच्या पाण्यामुळे गटारे तुंबून रस्त्यावर पाणी येणार नाही, रस्ता खराब होणार नाही. अशीही जनतेची मागणी आहे.संबधित ठेकेदाराने सदर रस्त्याचे संपुर्ण काम एसटीमेंट प्रमाणे दर्जेदार करावे अशी मागणी होत आहे.

