Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

प्रणय शिवगण यांची साहस क्षेत्रात उत्तुंग झेप

प्रणय शिवगण यांची साहस क्षेत्रात उत्तुंग झेप

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील प्रणय शिवगण यांने साहस क्षेत्रात उत्तुंग झेप घेत बेसिक माउंटेनियरिंग कोर्ससाठी शिफारस झाली आहे.

पाहलगाम (जम्मू-काश्मीर) येथील जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग अँड विंटर स्पोर्ट्स या प्रतिष्ठित संस्थेतर्फे १८ एप्रिल ते २ मे २०२५ या कालावधीत झालेल्या एडवेंचर अर्थात साहस अभ्यासक्रमात कॅडेट प्रणय गुरुनाथ शिवगण या विद्यार्थ्याने उत्कृष्ट कामगिरी करत कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
प्रणय हा वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी असून ५८ महाराष्ट्रीय एनसीसी युनिट, सिंधुदुर्ग या युनिटचे प्रतिनिधित्व केले. एनसीसी दिल्ली मुख्यालयामार्फत त्यांच्या या विशेष प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. या अभ्यासक्रमात त्यांनी दोरीच्या गाठी बांधणे, आधार तयार करणे, रॅपलिंग, झिप लाईन, प्रवाह ओलांडणे, जुमरिंग, बौल्डरिंग, तंबू उभारणी, ट्रेकिंग अशा विविध साहसी व तांत्रिक क्रियांमध्ये उल्लेखनीय कौशल्य दाखवले. त्यांच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल कर्नल हेम चंद्र सिंग यांनी त्यांचे विशेष कौतुक केले असून "बेसिक माउंटनियरिंग कोर्ससाठी शिफारस" केली आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, संस्थेचे पदाधिकारी आणि एनसीसी युनिटचे लेफ्टनंट रमेश काशेट्टी यांनी प्रणयचे हार्दिक अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

rapan bottom