वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग, वॉटर फोर व्हॉइसलेस, एक्वा मॅजिक सिंधुदुर्ग, पर्यटन व्यवसायिक महासंघ व तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांचा सामाजिक उपक्रम
वायरी-भूतनाथ येथे वॉटर बाउल वितरण
मालवण : पशु,पक्षी, किटक, साप तसेच निसर्गातील इतर सजीवांना उष्णता वाढीचा होणारा त्रास लक्षात घेता, त्यांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग, वॉटर फोर व्हॉइसलेस, एक्वा मॅजिक सिंधुदुर्ग, पर्यटन व्यवसायिक महासंघ व तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वायरी-भूतनाथ येथे पाण्यासाठी भांडी (वॉटर बाउल) वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला पर्यटन व्यवसायिक महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर तारकर्ली पर्यटन विकास संस्था अध्यक्ष सहदेव साळगावकर, वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग संस्थापक सदस्य दर्शन वेंगुर्लेकर, एक्वा मैजिक संस्थापक सदस्य राम चोपडेकर. तारकर्ली पर्यटन संस्था सल्लागार रविन्द्र खानविलकर, तारकर्ली सरपंच मृणाली मयेकर, पर्यटन व्यावसायिक केदार झाड, अभय पाटकर मिलिंद झाड, देवानंद लोकेगावकर, संदीप बोडवे, बाळू मुंडये,राकेश कुंटे, प्रभाकर वाळवे, आनंद हडकर,शाम झाड, हरेष पडवळ, जगन्नाथ पेडणेकर,रेवंडकर,प्रसाद भोजने अन्य पर्यत व्यावसायिक तसेच निसर्ग प्रेमी उपस्थित होते.

