Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

जातनिहाय जनगणना निर्णय म्हणजे राहुल गांधीच्या दूरदृष्टीचा विजय - इर्शाद शेख

जातनिहाय जनगणना निर्णय म्हणजे राहुल गांधीच्या दूरदृष्टीचा विजय - इर्शाद शेख

निलेश जोशी | कुडाळ : केंद्र सरकारला आज जातीय जनगणना घेण्यास भाग पाडणे ही देशातील जनतेच्या आणि राहुल गांधी यांच्या बांधिलकीचा विजय आहे. काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रत्येक वर्गाला योग्य हिस्सा देण्यासाठी कटिबद्ध आहे. देशभर जातनिहाय जनगणना घेण्याची सरकारची घोषणा ही राहुल गांधी यांच्या सततच्या संघर्षाचा आणि न्यायासाठी चाललेल्या लढ्याचा मोठा विजय आहे. असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी म्हटले आहे. जातनिहाय गणना करणाऱ्या केंद्रसरकारचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात इर्शाद शेख म्हणतात, राहुल गांधी यांनी वेळोवेळी समाजातील वास्तव मांडलं: देशातील जनता बऱ्याच काळापासून जातीय जनगणनेद्वारे सामाजिक न्यायाची मागणी करत आहे. राहुल गांधी यांनी संसदेपासून ते रस्त्यापर्यंत ही बाब वारंवार मांडली की जातीय जनगणना घ्यावी आणि तिच्या आकडेवारीनुसार सामाजिक न्याय सुनिश्चित करावा. राहुल गांधी यांनी जनतेला वचन दिले होते की आम्ही कोणत्याही परिस्थितीत जातीय जनगणना करून घेऊ. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीदरम्यान “जातीय जनगणना आणि हिस्सेदारी न्याय” याला आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केले आणि ही मागणी वारंवार पुढे केली.
आज केंद्र सरकारला जातीय जनगणना घेण्यास भाग पाडणे ही देशातील जनतेच्या आणि राहुल गांधी यांच्या बांधिलकीचा विजय आहे. काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रत्येक वर्गाला योग्य हिस्सा देण्यासाठी कटिबद्ध आहे. देशभर जातनिहाय जनगणना घेण्याची सरकारची घोषणा ही राहुल गांधी यांच्या सततच्या संघर्षाचा आणि न्यायासाठी चाललेल्या लढ्याचा मोठा विजय आहे.
“जातनिहाय जनगणना म्हणजे भारताचा एक्स-रे” — ती आपल्यातली विषमता उघड करणार आहे. राहुलजींनी ५०% आरक्षण मर्यादा हटवावी आणि खरी लोकसंख्या लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे समान संधी, आत्मसन्मान आणि न्यायाच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे परंतू केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा निश्चित करावी आणि जातनिहाय जनगणनेला मूर्त स्वरूप द्यावे. सरकारचा हा जुमला ठरू नये. समाजातील प्रत्येक घटकाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळेल तो दिवस भारतीय लोकशाहीचा विजय दिवस असेल. असे श्री. शेख यांनी शेवटी म्हटले आहे.

rapan bottom