Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कलेचा मनमुराद आनंद घ्या - अभिनेता प्रणव रावराणे

कलेचा मनमुराद आनंद घ्या - अभिनेता प्रणव रावराणे

संकल्प क्रिएशनच्या नृत्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

'वस्त्रहरण' च्या टीमची उपस्थिती

निलेश जोशी | कुडाळ : एखादी कला आपल्याला आनंद देते. ती कला मनापासून शिका त्याचा मनमुराद आनंद घ्या, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते प्रणव रावराणे यांनी केले. संकल्प क्रिएशन कुडाळ या संस्थेच्या वतीने लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नृत्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ आज संगीत वस्त्रहरण नाटकातील कलाकारांच्या उपस्थितीत कुडाळ येथे झाला. त्यावेळी प्रणव रावराणे बोलत होते. या शिबिराला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून २० मे रोजी या शिबिराची सांगता होणार आहे.
कुडाळच्या संकल्प क्रिएशन डान्स अकादमीच्या वतीने आज पासून नृत्य प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. या शिबिराचे उदघाटन 'वेतोबा' फेम अभिनेते उमाकांत पाटील यांच्या हस्ते नटराज पूजन करून झाले. यावेळी संगीत वस्त्रहरण नाटकांच्या निमित्ताने सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले या नाटकातील कलाकार प्रणव रावराणे, मुकेश जाधव, राजेश भोसलेतसेच सुप्रसिद्ध निवेदक निलेश गुरव, रंगकर्मी निलेश उर्फ बंड्या जोशी उपस्थित होते.
संकल्प क्रिएशनचे भूषण बाक्रे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकातुन भूषण बाक्रे यांनी शिबीरामागची भूमिका आणि शिबीर कसे चालणार आहे याची माहिती दिली. २० मे पर्यंत रोज सायंकाळी ३ ते ६ या वेळात हे नृत्य प्रशिक्षण शिबीर होणार आहे. त्यांनतर २० मे रोजी शिबिरार्थींचा सहभाग असलेला कार्यक्रम सादर केला जाणार असल्याचे बाक्रे यांनी सांगितले.
सर्व उपस्थित पाहुण्यांच्या वतीने अभिनेता प्रणव रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. कला हि माणसाला कसे जगायचे हे शिकवते, या पू ल देशपांडे यांच्या उद्गारांची आठवण करून देत त्यांनी प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संकल्प क्रिएशनच्या सौ. अदिती दळवी, सौ. सानिका कुडतरकर, योगेश शर्मा आणि इतर कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्र संचालन निलेश गुरव यांनी तर आभार प्रदर्शन भूषण बाक्रे यांनी केले. यावेळी सुमारे ५० शिबिरार्थी, तसेच पालक उपस्थित होते. दरम्यान वस्त्रहरण नाटकातील या कलाकारांनी नेरुरच्या श्री देव कलेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन देखील घेतले. .

rapan bottom