कसाल : जीवन शिक्षण मंदिर शाळा कसाल नंबर १ शाळेचा माजी विद्यार्थी प्रथमेश उमेश जोशी याने MPSC परीक्षेत प्रथम प्रयत्नात यश संपादन करत मंत्रालयातील महसूल विभागात नियुक्ती मिळवली. या उल्लेखनीय यशाबद्दल जीवन शिक्षण मंदिर कसाल नंबर १ प्रशाळेतर्फे प्रथमेश जोशीचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आता त्याची निवड मंत्रालयात महसूल विभागात झाली आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लवू महाडेश्वर कसाल केंद्रप्रमुख उत्तम हरमलकर जीवन शिक्षण मंदिर शाळा कसाल नं१ चे मुख्याध्यापक धोंडी चव्हाण शाळेचे सर्व शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

जीवन शिक्षण मंदिर शाळा कसाल नंबर १ शाळेच्या वतीने प्रथमेश जोशी यांचा सत्कार
