Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

चौके हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा उद्या महामेळावा

चौके हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा उद्या महामेळावा

मागील 61 वर्षातील माजी विद्यार्थी पुन्हा शाळेत एकवटणार ; स्नेहमेळावा ठरणार यादगार

चौके : मालवण तालुक्यातील चौके येथील पूर्वीचे महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके व आताचे भ.ता. चव्हाण, म. मा. विद्यालय चौके या प्रशालेतील शाळा स्थापनेपासूनच्या 1961 ते 2023 या कालखंडातील शाळेतून शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा शनिवार 3 मे रोजी चौके हायस्कूलच्या प्रागणांत माजी विद्यार्थी, माजी शिक्षक यांच्या उपस्थितीत शाळेचे माजी विद्यार्थी तथा शिक्षक श्री कृ.बा. करलकर सर यांच्या संकल्पनेतून पार पडत आहे.

चिमण्यांनो परत फिरा रे.. असे आवाहन करत शनिवार 3 मे 2025 रोजी सकाळी 8.00 ते रात्री 11.00 वाजेपर्यंत संपन्न होत असलेला हा मेळावा म्हणजे न भूतो न भविष्यती असा आपल्या विद्या मातेच्या मंदिरात भरणारा कुंभमेळाच ठरणार आहे. 61 वर्ष म्हणजे कपिलाषष्ठीचा योग.. आपल्या तमाम हजारो माजी विद्यार्थी बंधू भगिनींना भेटण्याची एकमेव दुर्मिळ सुवर्णसंधी सर्वांनाच लाभणार आहे. या महामेळाव्यात या 61 वर्षातील कालखंडातील शिक्षकाना सन्मानित करण्यात येणार आहे.

सदर मेळावा 2 सत्रात होणार असून दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी चौके गावासह पंचक्रोशीतील आंबेरी, देवली, साळेल, आमडोस, नांदरुख, कार्लाचाव्हाळ या पंचक्रोशीतील शेकडो माजी विद्यार्थी या महामेळाव्यास सहभागी होण्यासाठी इच्छुक झाले आहेत. चौके हायस्कूल माजी विद्यार्थी महामेळावा मंच, संस्था पदाधिकारी, स्थानिक संस्था पदाधिकारी, चौके पंचक्रोशीतील स्थानिक माजी विद्यार्थी मेळावा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत.

rapan bottom