Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

'त्या' आश्वासना नंतर उपसरपंच विजय नेमळेकर यांचे उपोषण स्थगित

'त्या' आश्वासना नंतर उपसरपंच विजय नेमळेकर यांचे उपोषण स्थगित

मालवण पंचायत समिती समोर उपसरपंच व सदस्य यांचे उपोषण होते सुरु

मालवण : ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करून कारवाई करावी यासह अन्य मागण्यांसाठी कोळंब ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय नेमळेकर यासह ग्रामपंचायत सदस्य मालवण पंचायत समिती समोर उपोषणास बसले होते. दरम्यान गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हे उपोषण स्थळी दाखल झाले. तक्रारीच्या अनुषंगाने एक महिन्यात चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल. असे आश्वासन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी दिल्यानंतर नेमळेकर व सदस्य यांनी आपले उपोषण स्थगीत केले.

25 जानेवारी 2025 ची ग्रामसभा झालीच नाही, त्याबाबत फेरचौकशी करून कारवाई करावी. ग्रामपंचायत मध्ये झालेल्या अपहाराची कोकण आयुक्तांनी सरपंच, ग्रामसेवक यांना दंडात्मक रक्कम भरणा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप पैसे भरणा न केल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. यांसह अन्य मागणीसाठी कोळंब ग्रामपंचायत उपसरपंच विजय नेमळेकर हे मालवण पंचायत समिती समोर उपोषणास बसले होते. यावेळी संदीप शेलटकर, निखिल नेमळेकर, संतोष परब, दिलीप नेमळेकर, नरहरी प्रभू, विलास धुरी, मीनल परब, संजना शेलटकर, सुजित नेमळेकर, आदी उपस्थित होते.

यावेळी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी उपोषणास्थळी भेट दिली. गटविकास अधिकारी दालनात त्यांनी उपोषण कर्त्यांशी चर्चा केली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे उपस्थित होते. शाम चव्हाण म्हणाले, आपण इथे कालच हजर झालो आहे. त्यामुळे तुमच्या अर्जांची माहिती घेऊन चौकशी करतो. तरी आपण उपोषण मागे घ्यावे अशी विनंती गटविकास अधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी चव्हाण यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विजय नेमळेकर यांनी उपोषण स्थगित केले.

rapan bottom