Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

आत्मदहनाचा इशारा देत पेट्रोल कॅन घेऊन आंदोलन…

आत्मदहनाचा इशारा देत पेट्रोल कॅन घेऊन आंदोलन…

दांडी येथील रस्ता अडवल्या प्रश्नी नागरिकांचे आंदोलन ; महिला भगिनीही आंदोलनात सहभागी

मालवण : मालवण शहरातील दांडी येथील दांडी लिंक रोड रस्ता सार्वजनिक वहिवाट म्हणून शासकीय दरबारी जाहीर झाला असतानाही वहिवाट बेकायदेशीरपणे अडवून दांडीतील हजारो भूमिपुत्रांची गैरसोय करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई न केल्याबद्दल मालवण प्रशासन व मालवण पोलीस स्टेशनच्या गलथान कारभाराविरुद्ध आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. मागणी बाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास प्रसंगी आत्मदहन करू असा इशारा देण्यात आला आहे. हेमंत मोंडकर व दांडी येथील नागरिक महिला भगिनी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

यावेळी पर्यटन व्यावसायिक म्हणाले, काही वर्षांपूर्वी नगरपालिकेने दांडी येथे केलेल्या या रस्त्यामुळे मच्छिमार, पर्यटन व्यवसाय याला फायदा झाला. मात्र संबंधित जागा मालकाने हा रस्ता बंद करून दांडी वासियांची अडवणूक केळी आहे. हा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असेही ते म्हणाले. सदर रस्ता वहीववाट म्हणून शासन दरबारीं कायदेशीर नोंद असताना हा रस्ता अडवणे हा गुन्हा आहे. असे असतानाही प्रशासनाकडून संबंधित जागा मालकावर गुन्हा दाखल केलेला नाही असे सांगितले.

तर नगरपालिकेने ३० लाख रुपये खर्च करून हा रस्ता बनविला असताना आता अडवणूक करणाऱ्या जागा मालकानेच रस्त्याचा शुभारंभ श्रीफळ वाढवून केला होता. आता विरोध कां करत आहेत. एका जागा मालकाने अडवणूक केल्याने पूर्ण रस्ता बंद असून रस्त्यासाठी जागा देणाऱ्या इतर नागरिकांना जागा दिल्याचा पश्चाताप होत आहे असे माजी नगरसेविका सेजल परब यांनी सांगितले. तर अन्वेषा आचरेकर यांनी रस्ता अडविल्यामुळे नागरिक व व्यवसायिकांची अडचण होत आहे. प्रशासन याबाबत लक्ष देत नाही, या प्रकारणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करून रस्ता खुला करावा, अशी मागणी केली. यावेळी, अन्वय प्रभू, आनंद हुले व अन्य नागरिकांनी भुमिका मांडली.

rapan bottom