कुडाळ : ३० एप्रिल रोजी कुडाळ येथील इंफिनिटी जिम येथे जिम मर्यादित डेडलिफ्ट स्पर्धा भरवण्यात आली होती. जिम मधील सदस्यांना स्पर्धांकरता प्रोत्साहन देणे व भविष्यात मोठ्या स्पर्धांसाठी त्यांची तयारी करून घेणे या उद्देशाने इंफिनिटी जिम मार्फत केवळ जिम मेंबर्ससाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
एकूण २५ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सर्वप्रथम सर्व स्पर्धकांचे वजन करून त्यांना तीन गटांमध्ये विभागण्यात आले. हे तीन गट,
गट क्र. १ : ५० ते ६० किलो, गट क्र. २ : ६० ते ७० किलो, गट क्र. ३ : ७० किलो वरील या प्रमाणे होते. गट विभागणी झाल्या नंतर प्रत्येक गटात कोणत्या स्पर्धकाने किती वजन उचलले याची नोंद घेतली गेली. त्यानंतर प्रत्येक गटात जास्तीत जास्त वजन उचलणारे तीन नंबर काढण्यात आले.
गट क्र. १ : ५० ते ६० किलो मधून संकेत कोलापटे हे विजेते ठरले असून उद्देश ठाकूर यांनी या गटातून द्वितीय क्रमांक तर आर्यन पाटकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
गट क्र. २ : ६० ते ७० किलो मधून जयदीप माने यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून ओमकार पाटील यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच विनायक भोई तृतीय क्रमांक प्राप्त झाला. त्याचप्रमाणे गट क्र. ३ : ७० किलो वरील या गटामधून रोहन बोभाटे हे विजेते ठरले असून ओमकार घुर्ये हे उपविजेते ठरले. तसेच प्रसाद पिंगुळकर यांनी या गटातून तृतीय क्रमांक मिळवला.
सर्व गटांमधून प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या सर्व विजेत्याना पदक व प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.गट क्रमांक एक व दोन च्या विजेत्यांना सौ. दीपा रमाकांत नाडकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच गट क्रमांक तीन म्हणजेच हेवी गट चा विजेत्यांना श्री. रमाकांत नाडकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. इन्फिनिटी जिमचे संचालक श्री. ईशान रमाकांत नाडकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व इन्फिनिटी जिम असेच त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत राहील असे आश्वासन देखील दिले. सर्व स्पर्धकांना व विजेत्यांना प्रशिक्षक कृणाल पेडणेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
नैसर्गिकरित्या व धोकादायक सप्लिमेंट्सचा वापर न करता मेंबर्सची शरीरयष्ठी सुधारणे व बॉडी-बिल्डिंग करणे हे इन्फिनिटी जिम चे प्रमुख विशिष्ट्य असल्याचे प्रशिक्षिक कृणाल पेडणेकर यांनी सांगितले.

