Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

जुन्या जेटीचे साहित्य समुद्रकिनाऱ्यावरून उठवावे ; अन्यथा पावसात मोठी समस्या निर्माण होणार

जुन्या जेटीचे साहित्य समुद्रकिनाऱ्यावरून उठवावे ; अन्यथा पावसात मोठी समस्या निर्माण होणार

नागरिकांचे बंदर निरीक्षकांना निवेदन

मालवण : मालवण बंदर जेटी येथील जुन्या जेटीचे साहित्य जेटीच्या बाजूला असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरून उठवण्यात यावे,असे निवेदन मालवण येथील पर्यटन व्यावसायिक, मच्छिमार, नागरिकांनार्फत बंदर निरीक्षक, मालवण याना देण्यात आले आहे.


मालवण बंदर जेटी येथील रस्ता काम गेले तीन महिने सुरू होते.यावेळी येथील स्थानिक व्ययसायिक तसेच ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. येणारे पर्यटक मालवण बंदर जेटी याठिकाणी फिरकत नसल्याने याचा फटका स्थानिकांना बसत होता. २९ एप्रिल रोजी हा रस्ता खुला करण्यात आला. परंतु हा रस्ता बनविताना जुना रस्ता खणून यथिकांचे सर्व साहित्य, माती, दगड, रस्त्याचे काँक्रीट, हे सर्व समुद्रकिनारी टाकण्यात आले आहे. याबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता काम पूर्ण झाल्यानंतर सर्व साफसफाई करण्यात येईल असे त्याने सांगितले होते.


परंतु अद्याप याठिकाणी कोणती ही साफसफाई करण्यात आलेली नाही. यामुळे पावसात होणारे धोके उद्भवण्याचे यातून स्पष्ट होत आहे.पावसामुळे सर्व माती, दगड,काँक्रीट हे पाण्याच्या ओघाने समुद्रात वाहून जात मालवणच्या जुन्या जेटीच्या खाली अडकून राहण्याची दाट शक्यता असून भविष्यात याचा त्रास किल्ला प्रवासी वाहतूक व छोट्या मच्छिमारांना आहे.


तरी याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती पर्यटन व्यवसायिक नागरिक रोहन रामचंद्र आचरेकर, संजय कृष्णा नार्वेकर, जॉनी मिंगेल फर्नांडिस, राजेश यशवंत आढाव,कीर्तिदा लिलाधर तारी, संजय विठ्ठल लांबोरे, धीरज धाकू बोडेकर, रोशन राजेंद्र भोगले,गणेश अनिल भोगले, अब्दुल गनि मुकादम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

rapan bottom