बंदरे विभाग राज्यात पहिल्या पाच क्रमांकात
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र दिन (1 मे 2025) बंदरे विभागासाठी अत्यंत आनंदाचा आणि गौरवाचा क्षण ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या '१०० दिवस कृती आराखडा 'उपक्रमात कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वातील बंदरे विभागाने उपक्रमशीलपणे काम करून लोकाभिमुख प्रशासन हे ध्येय साध्य करत राज्यात पहिल्या पाच क्रमांकात स्थान पटकावले.दरम्यान, मंत्री नितेश राणे यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून 'आमचे मंत्री राज्यात अव्वल'अश्या भावना व्यक्त होत आहेत.

या यशस्वी वाटचालीत मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असे सांगत मंत्री नितेश राणे यांनी धन्यवाद व्यक्त केले आहेत. राज्यातील जनतेच्या विकासाचे स्वप्न डोळ्यात ठेवून हि जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल विभागातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे व संबंधित अधिकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन! असे सांगून सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे नितेश राणे यांनी आभार व्यक्त केले. पाठीवर दिलेली ही कौतुकाची थाप जनताभिमुख काम करण्यास अजून प्रोत्साहित करेल यात शंका नाही. असेही या निमित्ताने मंत्री नितेश राणे म्हणाले. महायुती सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात बंदरे विभागाच्या यशस्वी कामांमध्ये
बंदर पायाभूत सुविधा विकास
पालघरमधील वाढवण बंदरासाठी महाराष्ट्र सागरी सहभागाच्या इक्विटी सहभागापोटी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध विजयदुर्ग आणि गणेशगुळे या बंदरांच्या विकासाकरिता पूर्व सुसाध्यता अहवाल तयार.
जहाज बांधणी व जहाज दुरुस्ती
जहाज बांधणी व जहाज दुरुस्ती (शिपयार्ड) विषयक धोरण तयार करून संबंधित प्रकल्पांसाठी सुयोग्य जागा निश्चित करून खाजगी भागीदारांसोबत धोरणात्मक युती बेलापूर शिपयार्ड क्लस्टर येथील 3 शिपयार्ड प्रकल्पांचे काम सुरू
वॉटर फ्रंट व लगतच्या जमिनीचा वापर
बंदरावर आधारित उद्योगांसाठी वॉटरफ्रंट व लगतची जमीन उपलब्ध करून देण्यासंदर्भातील संकल्प पत्रिका तयार
प्रवासी जलवाहतूकीस प्रोत्साहन
जेट्टी प्रकल्पांच्या कामांची अंमलबजावणी करून प्रकल्पांच्या कामास सुरुवात, नारंगी व खारवाडेश्री दरम्यान रो पॅक्स फेरी बोट सेवा सुरू मुंबई महानगर प्रदेशात वॉटरटॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी फिजिबिलिटी अभ्यास सुरू
मरीना विकास
बेलापूर, नवी मुंबई येथे मरीना प्रकल्पाच्या कामास सुरुवात
कोस्टल शिपिंगला चालना
कोस्टल शिपिंगला चालना देण्यासाठी कृती आराखडा तयार करून मालाची वाहतूक करण्यासाठी अंतर्गत जलमार्गाचा वापर
विद्यमान नौकांची श्रेणीवाढ
गेटवे ऑफ इंडिया आणि इतर ठिकाणच्या विद्यमान लाकडी बोटींचे रूपांतर करण्यासाठी तसेच बदली नवीन बोट आणण्यासाठी आराखडा तयारया पुढेही सर्वांच्या आशीर्वादाने या प्रकारे अनेक विकासाभिमुख कामे व जास्तीत जास्त गुंतवणूक व रोजगार निर्माण करण्याचा मानस असल्याचे सांगत मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे आभार मानले.


