महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या फक्त तीन सामनाधिकाऱ्यांमध्ये निवड
७ व्या खेलो इंडिया युथ गेम्स हा २०२५ मध्ये कब्बडी पंच म्हणून निवड
मिली मिश्रा | वालावल : खेलो इंडिया युथ गेम्स हा भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेली राष्ट्रीय स्तरावरील भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. सदर स्पर्धा ४ मे ते ८ मे या कालावधीमध्ये बिहार येथील राजगिरी या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून फक्त तीन सामनाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वालावल गावचा सुपुत्र श्री प्रितम वालावलकर या एकमेव राष्ट्रीय पंचाची नियुक्ती कब्बडी या खेळासाठी करण्यात आलेली आहे.
याहीपुढेही अशाच आणि याहीपेक्षा मोठ्या व्यवसायिक स्पर्धांमध्ये पंच म्हणून कामगिरी करण्याचा मानस बाळगून त्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि सर्वांच्या आशिर्वादने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव याहीपुढे क्रीडाक्षेत्रामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशी भावना राष्ट्रीय कब्बडी पंच प्रीतम वालावलकर यांनी व्यक्त केली.

