Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

'शिवराज भूषण' नाट्याचा मालवणात शुभारंभ

'शिवराज भूषण' नाट्याचा मालवणात शुभारंभ

मुख्याधिकारी संतोष जिरगे, अभिनेते अभय खडपकर यांची प्रमुख उपस्थिती

नाट्य संकल्पना आणि निर्मिती शिवभक्त भूषण साटम यांची

मालवण | प्रतिनिधी : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी मालवण येथे सादर होणाऱ्या 'शिवराज भूषण' या नाट्याचा तालीम शुभारंभ माझ्या हस्ते झाला ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. श्री शिवराज मंचाच्या वतीने सादर केली जाणारी ही नाट्यकृती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण सर्वत्र लौकिक प्राप्त करेल. असा विश्वास मालवण पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी केले.

शिवराज्याभिषेक दिन सोहळा वर्धापन दिनानिमित्त गतवर्षी मालवणातील कलाकारांनी 'सह्याद्रीचा सिंह राजा शिवछत्रपती' हे महानाट्य सादर केले होते. यावर्षी ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५१ व्या सोहळ्यानिमित्त श्री शिवराज मंच मालवण यांच्यावतीने 'शिवराज भूषण' हे ऐतिहासिक नाट्य साकारले जाणार आहे. या नाट्याचा तालीम शुभारंभ अक्षय तृतीया शुभ मुहूर्तावर मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच श्रीफळ ठेवून मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, अभिनेते अभय खडपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या नाटकाची संकल्पना आणि निर्मिती उद्योजक तथा शिवप्रेमी भूषण साटम यांची असून दिग्दर्शन गणेश मेस्त्री यांचे आहे. या नाटकाचे प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिवराज मंच तर्फे देण्यात आली आहे.

नाटकाचे निर्माते भूषण साटम यांनी प्रास्ताविक करत नाटक सादरीकरणामागील उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर कवी भूषण यांचा ब्रज भाषेतील छंदाचे त्यांनी अप्रतिम सादरीकरण केले. उपस्थितांनी त्याना उत्स्फूर्त दाद दिली.

यावेळी जेष्ठ व्यक्तीमत्व प्रकाश कुशे, भूषण साटम, संजय शिंदे, भाऊ सामंत, उद्योजक तथा शिवभक्त संजय गावडे, गणेश मेस्त्री, बबन परुळेकर, शुभदा टिकम, पूजा सरकारे, समीर शिंदे, गजानन मांजरेकर, सुभाष कुमठेकर, रोहित परुळेकर, उमेश परुळेकर यांसह अन्य कलावंत उपस्थित होते.

संतोष जिरगे म्हणाले, मालवण वासियांसाठी नाटक म्हणजे एक सण आहे. या नाटकामध्ये ५० कलाकार सहभागी होणार आहेत. नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हे तर आपली संस्कृती आणि आपले विचार मांडण्याची कलाकृती असल्याचे ते म्हणाले.

अभय खडपकर म्हणाले, एखाद्या गावात थिएटर नसणे याचे परिणाम एखाद्या गावाला माहिती आहे. या स्वर्गभूमी मध्ये माझा जन्म झाला आहे याचा मला अभिमान आहे. जगण्याचे स्वातंत्र्य ज्यांनी आपल्याला दिले त्या महापुरुषाचे हे नाटक खूप महत्वाचे आहे. एखाद्या मोठ्या कार्यकर्तृत्व असलेल्या माणसावर शंका होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांवर जो कोण शंका निर्माण करत असेल त्यांनी हे नाटक बघावे. संतोष जिरगे यांच्यासारखा माणूस तुम्हाला या मालवणसाठी लाभला आहे. त्यासाठी त्यांचेही खूप खूप अभिनंदन. आपली ही नाट्यकृती ऐतिहासिक होणार आहे. हे नाटक पाहण्यास येणारा एकही प्रेक्षक बाहेर जाऊ नये अशाप्रकारचे नाटकाचे टप्पे ठरवावेत. असे ते म्हणाले. यावेळी सगळ्यांच्या आग्रहाखातर बोलताना नाट्य दिग्दर्शक गणेश मेस्त्री म्हणाले, तमाम शिवभक्त जनतेला 'शिवराज भूषण' नाट्य कलाकृती सर्वोत्तम देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. जास्त काही बोलणार नाही. महाराजांचे आशीर्वाद आमच्या सर्वांसोबत आहेत. असे गणेश मेस्त्री म्हणाले.

rapan bottom